प्रत्येकासाठीच स्वतःच्या लग्नाचा दिवस हा आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असतो. त्यातूनच होणाऱ्या नववधूसाठी तर त्या दिवसाचे महत्त्व काही औरच. प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की, आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं. एवढच नव्हे तर इतरांपेक्षा आपला लूक वेगळा असावा आणि सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळाव्यात. त्यामुळे नववधूने लग्नाआधी आपली काळजी घेणं गरजेचं असतं. लग्नात परिधान करण्यात येणारे कपडे, दागिने याचबरोबर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणं आवश्यक असतं. जाणून घेऊया केस डॅमेज होण्याचं खरं कारण आणि ही समस्या दूर करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या टिप्स. डॅमेज केस फक्त कोरडेच असत नाही तर रूक्ष देखील होतात. अनेकदा त्यामुळे केसांना फाटे फुटतात किंवा केस गळण्याची समस्या उद्भवते. अशातच जर तुमच्या लग्नाची तारिख जवळ येत असेल तर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेणं गरजेचं आहे.
...म्हणून केस होतात डॅमेज
- अनेकदा लग्नाआधी लोकं नर्वस फिल करतात. तसेच त्यांना टेन्शनदेखील येतं. टेन्शन आणि स्ट्रेस यांमुळे हेअर फॉलची समस्या होते आणि स्काल्पही कमजोर होतात. - लग्नाच्या शॉपिंगसाठी नववधूला सतत घराबाहेर पडाव लागतं. ज्यामुळे बाहेरील धूळ आणि प्रदुषणामुळे केस डॅमेज होतात. याव्यतिरिक्त उशिरापर्यंत उन्हामध्ये राहिल्यामुळे केस कोरडे होतात, अनेकदा केसांचा रंगही बदलतो. परिणामी केस गळ्याची समस्या उद्बवते.
- हेयर स्टायलिंगसाठी यूज होणारं हेयर ड्रायर, हॉट रोलर्स, फ्लॅट आयर्न आणि कर्लिंग टॉन्गसचा वापर करण्यासाठी would be brideचे केस डॅमेज होतात. सतत कलर ट्रिटमेंट घेतल्यामुळे केसांवर परिणाम होतो. कारण यामध्ये अस्तित्वात असणारे केमिकल्स केसांसाठी अपयकारक ठरतात.
केस हेल्दी आणि चमकदार ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा :
- तुमच्या हेअर एक्सपर्टकडून सल्ला घेवून डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट जरूर घ्या.
- केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं.
- केसांचं टेस्कचर उजळवण्यासाठी शॅम्पूसोबत कंडिशनरचाही वापर करा. त्यामुळे केसांना आतून पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे केस सिल्की आणि शायनी दिसतात.
- कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी कंडिशनिंग ट्रीटमेंट आणि हेअर फॉलपासून बचाव करण्यासाठी अॅन्टी-ब्रेकरेज ट्रिटमेंट फॉलो करा.