सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण त्वचेची काळजी घेतात पण सौंदर्य खुलवण्यात त्वचेइतकाच महत्त्वाचा वाटा हा केसांचाही असतो. त्यामुळे त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. आजकाल लोकं त्वचेप्रमाणेच केसांसाठीही महागड्या ब्युटी ट्रिटमेंट फॉलो करताना दिसतात. केसांसाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी आमचा शॅम्पू केसांसाठी बेस्ट असल्याचा दावा करते. पण शॅम्पूमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स वापरले जातात. यांमुळे केसांना हळूहळू हानी पोहोचते. मग शॅम्पू वापरणं योग्य की नाही? किंवा आठवड्यातून किती वेळी शॅम्पू वापराचा? असे प्रश्न उपस्थित करण्यात येतात. जाणून घेऊयात शॅम्पू वापरणं केसांसाठी फायदेशीर आहे की नाही...
शॅम्पूचा वापर सतत करणं टाळा
केसांना शॅम्पू किती वेळा लावावा याबाबत एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, शॅम्पू केसांसाठी एका एम्लसिफायरप्रमाणे काम करतो. हे केसांवरील एक्स्ट्रा तेल, घाण आणि प्रदुषण स्वच्छ करण्यास मदत करतं. सामान्यतः आठवड्यातून 2 वेळा केसांना शॅम्पू करणं चांगलं असतं. परंतु, जर तुमचे केस प्रदुषणामुळे फारच घाण होत असतील तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा शॅम्पूने केस धुवू शकता. दररोज शॅम्पू करणं योग्य आहे का? या गोष्टीबाबत एक्सपर्टचं म्हणणं आहे की, दररोज शॅम्पू केल्याने काही फायदे देखील होतात. त्याचप्रमाणे नुकसान देखील होतं.
दररोज केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर केल्याने होणाऱ्या नुकसानाबाबत...
- जास्त शॅम्पूचा वापर केल्याने केसांच्या मुळांपाशी किंवा स्काल्पला असलेले आवश्यक तेलही निघून जाते.
- नॅचरल ऑइलच्या कमतरतेमुळे स्काल्पची त्वचा सुकून जाते आणि केसांच आरोग्य बिघडतं.
- केस गळण्याचे प्रमाण वाढते.
- शॅम्पूचा जास्त वापर केल्याने स्काल्पसोबत केसांमधील नॅचरल ऑईलही कमी होऊ लागतं. ज्यामुळे केसांची नॅचरल शाइन कमी होते.
अशा केसांना रोज शॅम्पू केल्याने होतो फायदा :
- ज्यांच्या केस फार ऑयली असतात त्यांना दररोज शॅम्पू केल्याने फायदा होतो.
- ज्या लोकांच्या स्काल्पची त्वचा गरजेपेक्षा अधिक ऑयली आहे तेदेखील दररोज शॅम्पू करू शकतात.
- जे लोक अधिक शारीरीक परिश्रमाची कामं करतात. तसेच कामासाठी दिवसबर बाहेर फिरतात त्यांना गरजेपेक्षा अधिक घाम येतो. अशा लोकांनीदेखील दररोज शॅम्पूने केस धुणं फायदेशीर ठरतं.
स्काल्पची त्वचा ऑयली आहे की नाही ते कसे ओळखाल ?
एक्सपर्टच्या मतानुसार, ज्या लोकांचा स्काल्पची त्वचाच ऑयली असते. त्यांनी दररोज किंवा एक दिवसाआड शॅम्पूने केस धुणं गरजेचं आहे. पण स्काल्प ऑयली आहे की नाही ते ओळखण्यासाठी सकाळी उठल्यावर केसांमध्ये हाताच्या बोटांनी मसाज करा. असे 4 ते 5 दिवस सतत केल्यानंतर जर दररोज बोटांवर तेल दिसू लागलं तर समजा की, तुमच्या स्काल्पची त्वचा ऑयली आहे.