उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यासोबतच केसही कव्हर करण्याचा सल्ला आपल्याला अनेकजण देतात. खरं तर सूर्याची प्रखर किरणं त्वचेलाच नही तर केसांनाही नुकसान पोहोचवतात. एवढचं नाही तर उन्हामुळे केस गळणं, तुटणं आणि पांढरे होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया कशाप्रकारे उन केसांना नुकसान पोहोचवतं आणि यापासून बचाव करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्याबाबत...
कसं केसांना नुकसान पोहोचवतं ऊन?
शरीरामध्ये मेलानिन नावाचं तत्व तयार होत असतं. जे त्वचेचा उजाळा वाढण्यासाठी आणि केस काळे आणि मजबुत करण्यासाठी मदत करतं. पण उन्हामध्ये जास्त वेळा राहिल्याने मेलानिन नष्ट होतं, ज्यामुळे तुम्हाला केस गळणं आणि पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
घाम आहे कारण
उन्हाळ्यामधील प्रखर उन्हामुळे शरीराच्या अवयवांप्रमाणे स्काल्पमधूनही घाम येतो. तुम्ही बाहेरून घरी आल्यानंतर जर केस स्वच्छ केलं नाही तर तो घाम सुकल्यानंतर केसांच्या मुळांमध्येच शोषला जातो. घामामध्ये सोडियम, झिंक, मॅग्नेशियम आणि अमोनिया असतं. जे केसांची मूळ डॅमेज करतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही उन्हामध्ये जास्त फिरता त्यावेळी केस हळूहळू कमजोर होतात आणि गळण्याचे प्रमाण वाढते.
केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरतं ऊन
शरीरामध्ये तयार होणारं मेलानिन तत्वामुळे केस काळे राहतात. परतु उन्हामध्ये जास्त राहिल्याने गे तत्व स्काल्पमधून नष्ट होतं. यामुळे केसांचा रंग मुळांपासून बदलतो आणि हळूहळू केस पूर्ण पांढरे होतात.
डॅड्रफ आणि घाण हेदेखील कारण
स्काल्पवर घाम असल्यामुळे धूळ, माती आणि प्रदूषणाचे कणही केसांच्या मुळांशी जमा होतात. घामामुळे केसांच्या मुळांशी ओलावा निर्माण होतो आणि ही तत्व केसांच्या मुळांशीच सडतात. ज्यामुळे डँड्रफ आणि ड्राय स्काल्पची समस्या होते.
अशी घ्या काळजी :
- उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घेणं आवश्यक असतं. जर तुम्ही केसांची खास काळजी घेतली तर या समस्यांपासून दूर राहू शकता.
- उन्हामध्ये बाहेर निघताना छत्री किंवा स्कार्फचा वापर करा आणि केसांना ऊन लागू देऊ नका. यामुळे सूर्याची अल्ट्रावायलेट किरणं थेट केसांच्या मूळापर्यंत पोहचू शकणार नाही.
- बाहेरून घरी परतल्यानंतर आपम प्रत्येकवेळी केस धुवू शकत नाही. परंतु घाम नक्की स्वच्छ करू शकता. त्यामुळे जेव्हाही घाम येतो. त्यावेळी स्काल्प व्यवस्थित पुसून स्वच्छ करा.
- दिवसभरामध्ये कमीत कमी 8 ते 9 ग्लास पाणी नक्की प्या. जेणेकरून त्वचेसोबतच स्काल्पही हायड्रेट राहतील.
- उन्हाळ्यामध्ये केसांना आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा शँम्पू करा. त्याचबरोबर केसांना कंडिशनर करायला विसरू नका.
- आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असलेल्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तुमचे केस मुळांपासून हेल्दी राहतील.
- दररोज केसांना तेल लावणं टाळा. आठवड्यामध्ये 2 वेळा तेल लावून 2 ते 4 तासांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर केस माइल्ड शॅम्पूने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.