चेहऱ्याच्या आकारानुसार करा ‘हेअरस्टाईल’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 6:13 PM
आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्यासाठी हेअरस्टाईलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हेअरस्टाईल सिलेक्ट करताना आपल्या चेहऱ्यावर किती सूट करेल हे अगोदर पाहावे. यासाठी आपण कोण्या एक्सपर्टचाही सल्ला घेऊ शकता. हेअरस्टाईल अशी असावी की जी आपल्या चेहऱ्यावर आकर्षक वाटेल.
आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्यासाठी हेअरस्टाईलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हेअरस्टाईल सिलेक्ट करताना आपल्या चेहऱ्यावर किती सूट करेल हे अगोदर पाहावे. यासाठी आपण कोण्या एक्सपर्टचाही सल्ला घेऊ शकता. हेअरस्टाईल अशी असावी की जी आपल्या चेहऱ्यावर आकर्षक वाटेल. एका संशोधनानुसार आपल्या चेहऱ्यावर सूट करणाऱ्या हेअरस्टाईलमुळे तणावाचे प्रमाण कमी होते. हेअरस्टाईल करताना कधी कुणाची कॉपी करू नका. बरेचजण आपले मित्र किंवा अन्य व्यक्तिंच्या हेअरस्टाईलची कॉपी करतात, मात्र ती हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्यावर सूट करेलच असे नाही. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण, आकार वेगवेगळा आहे. आजच्या सदरात चेहऱ्याच्या आकारानुसार कशी हेअरस्टाईल करावी याबाबत जाणून घेऊया...लांब चेहऱ्यासाठी जर आपल्या चेहऱ्याचा आकार लांब असेल तर चेहºयावर कमीत कमी केस येतील अशी हेअरस्टाईल करा. लांब चेहऱ्याच्या मुलींना लहान आणि मध्यम लांबीचे केस जास्त सूट करतात. गोल चेहऱ्यासाठीगोल आकाराच्या चेहऱ्यावर खालून गोल शेप दिलेले केस चांगले वाटतात. ज्या तरुणीच्या चेहऱ्याचा आकार गोल आहे, त्यांच्यासाठी अशी हेअरस्टाईल खूपच आकर्षक दिसते. ही हेअरस्टाईल करताना केसांची लांबी मध्यम आणि खालून गोलाकार असावी. ओवल शेप (अंडाकृती) चेहऱ्यासाठीओवल शेपच्या चेहऱ्यावर सर्व प्रकारच्या हेअरस्टाईल सूट करतात. जर आपल्या चेहऱ्याचा आकार ओवल शेप म्हणजेच अंडाकृती आकाराचा असेल तर आपण लहान केसांचीही निवड करु शकता. जर आपले केस लांब असतील तर हे केस देखील आपल्याला आकर्षक वाटतील. जर आपले केस पातळ असतील आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. अशावेळी आपण ब्लंट कटिंग करु नये. चौकोनी चेहऱ्यासाठीजर आपल्या चेहऱ्याचा आकार चौकोनी असेल तर लहान आणि मध्यम आकाराच्या केसांची हेअरस्टाईल करु शकता. ही हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्यावर आकर्षक तर वाटेलच शिवाय आत्मविश्वासातदेखील वाढ होईल. हृदयाच्या आकाराच्या चेहऱ्यासाठी जर आपल्या चेहऱ्याचा आकार हृदयासारखा आहे, तर मानेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लांब असलेल्या केसांची हेअरस्टाईल करु शकता. ही हेअरस्टाईल आपल्याला वेगळाच लूक देईल व व्यक्तिमत्त्वात भर पाडेल.