आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करणारी आणि मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेली ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज 45वा वाढदिवस. बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक नावाजलेली अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्याच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. आपलं सौंदर्य जपण्यासाठी ऐश्वर्या आपल्या डाएटकडे फार काळजीपूर्वक लक्ष देते. म्हणूनच तिच्या वाढत्या वयाचा तिच्या सौंदर्यावर अजिबात प्रभाव दिसत नाही आणि वयाच्या 45व्या वर्षीही ती ग्लॅमरस दिसते.
ऐश्वर्या आपल्या डाएटबाबत अजिबात च्यूझी नाही पण आपलं डाएट बॅलेन्स असावं याकडे ती कटाक्षाने लक्ष देते. ऐश्वर्या आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत फार शिस्तप्रिय असते. जंक फूड, फॅटी फूड आणि तळलेल्या पदार्थांपासून ती नेहमी दूर राहणं पसंत करते.
उकडलेल्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, फळांचा ज्यूस, दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ यांचा समावेश असलेलं फॅट फ्री डाएट म्हणजेच ऐश्वर्याच्या सौंदर्याचं गुपित आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. जे स्किन हेल्दी आणि तजेलदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
ऐश्वर्याच्या डाएटमध्ये नेहमी नॉर्मल राइसऐवजी ब्राउन राइसचा समावेश करते. ब्राउन राइसमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. जे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवतं आणि फॅट बर्न करण्यासाठी मदत करतं. दिवसभरात 3 वेळी पोटभर खाण्याव्यतिरिक्त ऐश्वर्याला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाणं आवडतं. यामागील हेतू म्हणजे एकाचवेळी खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्याने भूक लागत नाही आणि आरोग्य राखण्यास मदत होते. कारण उपाशी राहिल्यामुळे वजन वाढतं आणि त्यामुळे तब्बेत बिघण्याचा धोका असतो.
ऐश्वर्या नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून पिते. त्याचप्रमाणे जेवणामध्ये तिला डाळ, तांदूळ, मासे आणि चिकन करी फार आवडते. स्विट डिश म्हणून तिला चॉकलेट्स फार आवडतात.