बॉलिवूड देसीगर्ल प्रियंका चोप्राचा आज ३६वां वाढदिवस. प्रियंका आता बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली जादू चालवत आहे. प्रियंकाचा जन्म १८ जुलै १९८२ मध्ये झाला. २००२ मध्ये प्रियंकाने केवळ १८ व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब मिळवता आणि पुन्हा तिने मागे वळून पाहिलेच नाही.
२००३ मध्ये प्रियंकाने 'द हीरो' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर एकापाठी एक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केले. आज ती बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये आहे. प्रियंकाचे फॅन्स केवळ भारतातच नाहीतर जगभरात आहेत. प्रियंका ही तिच्या कामासोबतच हॉट आणि फिच फिगरसाठीही लोकप्रिय आहे. तिच्या फिटनेसची नेहमी चर्चा होत असते.
इतक्या बिझी शे्ड्युलमध्ये प्रियंका स्वत:ला इतकी फिच कशी ठेवते याचं तिच्या चाहत्यांना आश्चर्यही वाटतं. प्रियंकाने अनेकदा आपल्या फिटनेसचं गुपित उघड केलं आहे. चला जाणून घेऊ काय आहे तिच्या हॉट आणि फिट फिगरचं गुपित....
प्रियंकाचं वर्कआउट
प्रियंकाचं वजन ५५ किलो आणि उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. ती नियमीत जिममध्ये जाते आणि आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करते. प्रियंका ट्रेडमिल आणि पुशअपनंतर २०-२५ रिव्हर्स क्रंचेज करते. त्यासोबतच ती तिच्या मानसिक आरोग्यासाठी रोज योगाभ्यास करते. तिला योगा करणे पसंत आहे.
प्रियंकाचा डाएट प्लॅन
प्रियंका आपल्या डाएटबाबत चांगलीच स्ट्रिक्ट आहे. प्रत्येक दोन तासात काहीना काही खाण्याचा तिचा नेहमी प्रयत्न असतो. ती नारळाचं पाणी रेग्युलर पिते आणि सोबतच ड्रायफ्रूट्स खाते. प्रियंका सतत पाणी पित असते. याने ती स्वत: हायड्रेट ठेवते. त्वचा चांगली ठेवण्यासाठी ती दिवसातून किमान १० ग्लास पाणी पिते. ज्या पदार्थांमुळे वजन वाढतं असे पदार्थ ती खात नाही. तिच्या डाएटमध्ये चपाती, भाज्या, सूप, सॅलड, थोडा भात, डाळ आणि फळं हे असतात.
प्रियंकाचा फिटनेस मंत्र
प्रियंकानुसार, तिला जिम जाणे तसे फारसे आवडत नाही पण तिला बॉडी फिट ठेवण्यासाठी ते करावं लागतं. ज्यांना तिच्यासारखा फिगर हवा आहे त्या प्रत्येक मुलीला ती योगा करण्याचा सल्ला देते. चॉकलेट आणि केक खाण्याची इच्छा झाली तर ती शनिवारी खाते.