(Image Credit ; fashionbeans.com)
अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकजण केसगळतीच्या समस्येने हैराण झाले आहेत. अनेकांना कमी वयातच टक्कल पडलं आहे. अशात हे लोक वेगवेगळे उपाय करून गमावलेले केस परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. काहींना यश येतं तर काहींना नाही. अशात केसगळतीने किंवा टक्कल पडल्याने हैराण असणाऱ्या लोकांसाठी एक आशेची किरण आहे. वैज्ञानिकांनी एक असं उपकरण विकसित केलंय, जे घालून केस पुन्हा केस येऊ लागतील.
अमेरिकेतील विस्कॉन्सिन मेडिसिन विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जूडोंग वांग यांनी एक खास टोपी तयार केली आहे. जी टोपी जी व्यक्ती घालेल त्या व्यक्तीतून ऊर्जा प्राप्त करते आणि केसांचे रोम उत्तेजित करण्यासाठी इलेक्ट्रिक पल्सेज पाठवते. हे पल्सेज डोक्यावर पुन्हा केस उगवण्यासाठी मदत करतात.
प्राध्यापक जूडोंग वांग यांनी हा रिसर्च एसीस नॅनो नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. या उपकरणाचा पहिला प्रयोग उंदरांवर करण्यात आला. आणि हा प्रयोग यशस्वी ठरला.
प्राध्यापक वांग यांच्यानुसार, केस उगवण्यासाठी टोपी सतत घालून राहणे गरजेचं नाही. दररोज काही तास ही टोपी घालून राहणं पुरेसं आहे. झोपेलेले असताना ही टोपी काम करत नाही, कारण झोपेत या उपकरणाला व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जा मिळू शकत नाही.
वांग सांगतात की, ही टोपी केवळ त्या पुरूषांवर काम करेल जे वर्तमानात केस गमावत आहेत किंवा ज्यांचे नुकतेच टक्कल पडले आहे. कारण टक्कल पडून अनेक वर्ष झाली असतील तर त्वचेची केस उगवण्याची क्षमता नष्ट होते.