वाढत्या वयात तोंडावर सुरकुत्या येणं, वयवाढीच्या खुणा दिसणं ही समस्या उद्भवते. बदलत्या लाईफस्टाईलसह लोकांच्या आहाराची पद्धतही बदलली आहे. दररोज व्यायाम करणं, त्वचेची काळजी घेणं, झोप घेणं शरीराला दीर्घकाळ ताजंतवानं ठेवण्यासाठी गरजेचं असतं. पण या गोष्टींबाबत जास्तीत जास्त लोक हे निष्काळजीपणा करतात. आहारात काही पदार्थांचे अति सेवन वयवाढीच्या खुणांसाठी कारणीभूत ठरतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेच्या अतिसेवनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो.
उच्च साखरयुक्त आहाराने शरीराचं नुकसान
टफ्ट्स यूनिवर्सिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त साखरेच्या आहारामुळे शरीरात जास्त प्रमाणत टॉक्सिन्स तयार होतात. या टॉक्सिन्समुळे विषारी पदार्थांना बाहेर टाकणारी शरीराची क्षमता कमी होते. अशा प्रकारे जास्त साखर असलेल्या आहाराचे सेवन केल्यास दोन्ही बाजूंनी शरीरावर परिणाम होतो. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि टफ्टस युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ऐलन टेलर यांनी सांगितले की, ''या अभ्यासात आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की, जास्त साखरेचा आहार शरीरावर कसा वाईट परिणाम करतो. ''
जास्त साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं वाढत्या वयात आजारांचाही धोका वाढतो. उच्च साखरेच्या अन्नामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, डायबिटीस आणि मॅक्युलर डीजेनेरेशनची समस्या उद्भवते. मॅक्यूलर डीजेनेरेशन हा एक आजार आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अंधत्व येते. p62 नावाचे प्रोटिन्स आपल्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी शरीरात कार्य करतात. साखरेच्या आहारातमध्ये समावेश असलेले बायोप्रोडक्ट advanced glycation end products (AGEs) ला काढून टाकण्याचे कार्य करते.
शरीरात p62 जितक्या कमी प्रमाणात असेल तितकंच advanced glycation end products जास्त प्रमाणात जमा होईल. त्यामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू शकते. इतकंच नाही तर शरीराचा विषारी घटकांपासून बचाव करणारी प्रणालीही प्रभावित होते. ऐलन टेलर म्हणतात, "असे नाही की शरीराला साखरेची मुळीच गरज नसते. कोणत्याही प्रकारच्या साखरेचे सेवन करणं पूर्णपणे थांबवणं देखील आवश्यक नाही. साखर आहाराऐवजी चरबीयुक्त खाद्यपदार्थ खाणं नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून नेहमी संतुलित आहार घ्या. आहारात पोषक, पौष्टिक घटकांचा समावेश करा.'' याशिवाय कमी वयातच सुरकुत्या, वय वाढीच्या खुणा दिसण्यासाठी अनियमित आहार, झोपेचा अभाव तसंच जास्त प्रमाणात साखर खाणं हे घटक प्रभावी ठरू शकतात.
हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर
उच्च साखरयुक्त आहार टाळण्यासाठी काही गोष्टी थांबवल्या पाहिजेत. सॉस, कॅचअप्स, पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स, चॉकलेट दूध, ग्रॅनोला, फ्लेवर्ड कॉफी, आईस टी, सूप, प्रथिने बार, व्हिटॅमिन वॉटर यामध्ये मोठया प्रमाणावर साखर असू शकते. म्हणून दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी प्रमाणात साखरेचे सेवन करा.