आरोग्याची काळजी घेणारे ‘केअरकिट’ अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2016 6:13 PM
‘केअरकिट’ नावाच्या या अॅपद्वारे तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता.
तंत्रज्ञान आणि आपले आयुष्य आता वेगळे नाही होऊ शकत. मोबाईल टेक्नॉलॉजीने तर आपले दैनंदिन व्यावहारच बदलून टाकले आहेत. खरेदी असो वा विक्री सर्वच गोष्टींचे मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी एखादे अॅप असावे असे वाटण्यास काही हरकत नसावी.अॅपलने हाच विचार करून एक नवीन अॅप टूल विकसित केले आहे. ‘केअरकिट’ नावाच्या या अॅपद्वारे तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. मधुमेहापासून ते गर्भावस्थेपर्यंत सर्व वैद्यक ीय गोष्टींवर तुम्ही देखरेख ठेवू शकता. एवढेच नाही तर नैराश्यावर मात करण्यासाठीसुद्धा ‘केअरकिट’ कामी येऊ शकते.तसे पाहिले तर सध्या मार्केटमध्ये आरोग्याशी निगडित खूप सारे अॅप उपलब्ध आहेत. परंतु, हेल्थ अॅपमध्ये अधिक गुणवत्ता आणि नवे तंत्रज्ञान आणण्याच्या हेतूने अॅपलने ‘केअरकिट’ विकसित केले आहे. यामध्ये अनेक सॉफ्टवेअर टूल्स आणि टेम्पलेट्स असून त्याच्या उपयोग करून हेल्थकेअर ग्रुप्स आणि हेल्थ-टेक स्टार्ट अप्स स्वत:चे अॅप बनवू शकतात.कंपनीने म्हटले आहे की, रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, उपचारांची माहिती, डॉक्टरकडे रिपोर्ट पाठविणे यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी डेव्हलोपर्सना अॅप बनविण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने आम्ही ‘केअरकिट’ची निर्मिती केली आहे.