आरोग्यवर्धक काळे मिरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2016 2:45 PM
काळे मिरे हे तिखट असून, मानवाच्या शरीरासाठी लाभदायक आहे.
आयुर्वेदीक औषधीमध्ये या मिरांचा मोठा वापर केला जातो. या मध्ये असलेल्या पिपेरीन या घटकामुळे तिला स्वाद येतो. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या आहेत. काळी मिरे ही स्वाद गं्रथीला उत्तेजित करण्याचे काम करते. तसेच पोटात हाइड्रोक्लोरिक एसीड स्त्राव वाढविण्याचे काम करतो. तसेच जेवण पचन होण्यासाठी ती चांगले असते.ही मिरे पचण्याबरोबरच पोटदुखणे, पोट फुगणे आदी समस्यासाठीही उपयुक्त आहे. यामध्ये एंटी- बैक्टीरियल गुण असतात. बैक्टीरिया मुळे होणाºया आजारही यामुळे पळवून लावतात येतात.ज्यांना भूक चांगल्याप्रकारे लागत नाही. त्यांच्यासाठी काळी मिरे हा भूकवाढीसाठी चांगला पर्याय आहे. आयुर्वेदात सांगितले आहे की, दीड चमचा काळी मिरची व गुळाचे मिश्रण करुन, जोपर्यंत भूक वाढ होत नाही तोपर्यंत त्याचे दररोज सेवन करीत राहावे. वजन कमी करण्यासाठीही काळी मिरची ही उपयोगाची आहे. यामुळे शरीरातील फॅटही कमी होतो. तसेच कॅ लरीज जाळण्यासाठी उपयुक्त आहे.अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर एक ग्लास ताकामध्ये काळी मिरची व जीरा पावडरचे मिश्रण करुन, ते प्यावे. परंतु गर्भवती महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.