मुंबई - रंगांची उधळण करणारा होळीचा क्षण आता काही तासांवर आला आहे. सर्वांनी होळीची सर्व तयारी केली असेलच. मात्र होळीमध्ये केमिकलचे रंग आणि गुलालाचा खूप उपयोग होतो. असा गुलाल आणि रंग चेहरा, केस किंवा नखांना लागला तर तो जाता जात नाही. हा रंग घालवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही लोकांच्या चेहऱ्यावरील रंग सहजपणे निघून जातो. मात्र काही जणांच्या चेहऱ्यावरील रंग जात नाही. त्यानंतर असा रंग काढण्यासाठी केमिकलयुक्त शाम्पू आणि अन्य माध्यमातून हा रंग काढण्याचा प्रयत्न केला तर त्वचा आणि केसांचं नुकसान होतं. त्यामुळे यावर्षी होळी खेळताना चेहऱ्यावर, केसांना आणि नखांना रंग लागल्यास काय करायचं, अशी चिंता तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला आज काही असे उपाय सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून चेहरा, केस आणि नखांमधील कलर सोप्या पद्धतीना काढता येईल.
चेहरा आणि शरीराच्या इतर भागावरील रंग काढण्यासाठी लोक त्वचेला स्क्रब करायला सुरुवात करतात. मात्र असे कधीही करता कामा नये. असे केल्याने त्वचेवरील रंग निघून जातो. पण त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. चेहरा आणि त्वचेवरील कलर काढण्यासाठी बॉडीवॉश किंवा साबणाने आंघोळ करताना शरीरावर थोडेसे तेल चोळा. त्यामुळे केवळ त्वचेवरील रंगच निघून जाणार नाही तर कोरड्या त्वचेचे पोषणही होईल. जर तुम्हाला तेलाचा उपयोग करायचा नसेल तर तुम्ही क्रिम किंवा लोशनचाही वापर करू शकता. त्यानंतर तुम्ही जेव्हा शरीर टॉवेलने पुसाल तेव्हा सर्व रंग टॉवेलमध्ये आलेला दिसेल.चेहऱ्यावरील रंग कसा काढावा त्याशिवाय क्लीजिंग फेस वॉशचा वापर करून त्यानंतर मॉइस्चरायझरचा वापर करा. आवश्यक असेल तर तुम्ही पुढच्या दिवशी फेसमास्कचा वापर करू शकता. जर होळी खेळण्यापूर्वी तुम्ही शरीरावर तेलाचा वापर करत असाल तर टॅनिंगपासून वाचण्यासाठी तेलावर सनस्क्रिनही लावू शकता. जर तुम्ही बेसन, दही आणि लिंबाच्या मिश्रणासारखा घरगुती उपचार रंग घालवण्यासाठी वापरत असाल तर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी त्या मिश्रणामध्ये व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल मिसळा. केसांवरील रंग कसा हटवावा रंग खेळल्यावर केसांना शाम्पू लावा. रंग काढण्यासाठी दोन वेळा शाम्पूची आवश्यकता भासू शकते. तसेच तुम्हाला थकवा जाणवला तरीही कंडिशनर लावणे सोडू नका. कारण तुमच्या केसांना होळीनंतर अतिरिक्त हायड्रेशनची आवश्यकता भासेल. कंडिशनरनंतर हेअर सीरम लावा. तो केसांना उन्हाचा प्रभाव आणि रंगांमुळे होणारा रुक्षपणा दुरुस्त करेल. केस घळणे कमी करण्यासाठी हेअर स्पा करा किंवा घरामध्येच डीप कंडिशनिंग मास्कचा वापर करा. नखांवरील रंग कसा हटवावानखांना रंगांपासून वाचवण्याचा सोपा उपाय म्हणजे तुम्ही ट्रान्सपरंट नेलपॉलिश लावून घ्या. रंग खेळल्यानंतर ते नेल पॉलिश रिमुव्हरने सहज निघून जाईल. त्यानंतरही नखांवरील रंग गेला नाही तर नखांना गरम पाण्याच्या टबमध्ये बदामाच्या तेलासह भिजवा. त्यानंतर नखांचा रंग निघून जाईल. तसेच नखांवर काही दिवसांपर्यंत काहीही लावू नका. या गोष्टीवर विशेष लक्ष द्या जर रंग खेळल्यानंतर तुम्हाला कुठलीही इचिंग किंवा खाज येत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा. जर तुमची स्किन सेन्सेटिव्ह असेल तर काही ठराविक रंगांसोबत होळी खेळणे टाळा किंवा आधी डर्मेटोलॉजिस्टकडून सल्ला घ्या. त्यानंतरच रंग खेळा. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.