केसांची अधिक केवळ महिलांनीच घ्यावी असा एक सामान्य समज आहे. कारण काय तर महिलांचे केस लांब असतात. पण महिलांसोबतच पुरुषांनीही केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांना केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे हेअर पॅक माहीत असतात.
पण पुरुषांना याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे आम्ही पुरुषांसाठी काही खास हेअर पॅकची माहिती घेऊन आलो आहोत. जर तुम्ही जास्तीत जास्त वेळ धुळ, माती आणि प्रदूषणात राहत असाल तर अर्थातच याचा वाईट प्रभाव तुमच्या केसांवर पडेल. याने केस डॅमेज होता आणि केसांमध्ये डॅंड्रफ होतात. यावर काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता.
बनाना हेअर पॅक
जर तुमचे केस रखरखीत आणि टाइट आहेत यासाठी तुम्ही बनाना हेअर पॅक वापरु शकता. एक पिकलेलं केळं घ्या, त्यात एक चमचा मध थोडा लिंबाचा रस एकत्र करा. या गोष्टी चांगल्याप्रकारे एकत्र करा आणि केसांच्या मुळात लावा. नंतर हलक्या शॅम्पूने केस धुवा.
अंडा हेअर पॅक
या हेअर पॅकने कोणत्याही प्रकारचा हेअर डॅमेज चांगला केला जाऊ शकतो. अंड्याला पांढरा भाग ध्या, त्यात १ चमचा मध, लिंबाचा रस आणि १ चमचा ऑलिव्ह आइल मिश्रित करा. हे मिश्रण डोक्यावर लावा आणि २० मिनिटांनी केस धुवावे.
मेथी पॅक
जर तुम्हाला तुमचे केस शायनी आणि मुलायम करायचे असतील तर हा हेअर पॅक लावू शकता. मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर याची पेस्ट तयार करा आणि यात अर्धा कप दही टाका. ही पेस्ट डोक्यावर चांगल्याप्रकारे लावा. जेव्हा हे मिश्रण कोरडं होईल केस शॅम्पूने चांगले धुवा.
मेंदी लावा
मेंदीचा पॅक लावाल तर याने तुमच्या केसांना पोषणही मिळेल आणि रंगही मिळेल. मेंदी पावडरमध्ये तुम्ही आवळा आणि २ चमचे दूध टाकून याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना एक तासांसाठी लावून ठेवा. त्यानंतर केस धुवा.
जास्वंद पॅक
जास्वंदाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्यात जोजोबा तेल किंवा खोबऱ्याचं तेल मिश्रित करा.ही पेस्ट केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. कोरडी झाल्यावर केस धुवा.
(टिप - वरील उपाय आणि सल्ले हे केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. हे सर्वांनाच फायदेशीर ठरतील असे नाही. त्यामुळे यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तसेच याने प्रत्येकाला फायदाला होईल असा दावाही आम्ही करत नाही.)