हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं फार अवघड काम असतं. हिवाळ्यातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते, तसेच यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. अनेकदा त्वचेसाठी मॉयश्चरायझरचा वापर करूनही कोरडेपणा काही कमी होण्याचं नाव घेत नाही. तसेच यामुळे त्वचेच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी अनेक लोकं सीरमचा आधार घेतात. पण अनेकांना एकच प्रश्न सतावत अशतो की, थंडीमध्ये सीरम वापरावं की नाही?
फेस सीरम हे लिक्विड स्वरूपात असते त्यामुळे ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेमध्ये लगेच शोषलं जातं. याचा नियमित वापर केल्यास काही दिवसातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बदल जाणवू लागतील. तुम्ही याचा वापर मॉयश्चरायझर लावण्याआधी करू शकता. साधारणतः सीरम इसेंशिअल ऑइलपासून तयार होतं. जे त्वचेला आतून हायड्रेट करण्यास मदत करतं. नियमितपणे सीरमचा वापर केल्याने त्वचेवरील डाग निघून जातील आणि त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते.
थंडीमध्येही वापरा सीरम
ग्लिसरीन, नारळाचे तेल, गुलाब पाणी आणि लिंबू यांपासून तयार करण्यात येणारं हे सीरम थंडीमध्येही त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतं. थंडीमध्ये त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय ठरतो सिरम. ज्या लोकांच्या त्वचवर डाग असतात त्यांच्यासाठी सीरम फार उपयोगी ठरतं.
सीरमचे फायदे - - सीरमचा वापर केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि तजेलदार दिसते.
- सीरम क्रिमसारखे चिकट नसतात आणि त्वचेची रोमछिद्रांतील घाण स्वच्छ करतात.
- फाउंडेशन लावण्यासाठी हे बेस तयार करतात.
- सीरम्स त्वचेमध्ये सहज प्रवेश करून क्रिमपेक्षा चांगला रिझल्ट देतात.
अनेकांची स्किन अत्यंत सेंसिटिव्ह असते त्यामुळे बाजारातून आणलेलं सीरम वापरावं की नाही या विचारात ते असतात. अशातच तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सीरम घरीही तयार करू शकता. जाणून घेऊया सिरम घरी कसं तयार करावं त्याबाबत...
असं करतं काम :
लिंबाच्या रसामध्ये ब्लीचिंग एजंट असतात आणि गुलाब पाण्यामध्ये फिनाइलेथेनॉल अस्तित्वात असतं. ही दोन्ही तत्व नॅचरल ऐस्ट्रिन्जेंटचं काम करतं. जेव्हा हे सर्व एकत्र करून त्वचेवर लावण्यात येतं त्यावेळी त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
असं करा तयार :
सीरम तयार करण्यासाठी गुलाब पाण्याची एक छोटी बाटली घ्या. त्यामध्ये एका लिंबाचा रस आणि ग्लिसरीन एकत्र करा. आता सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. हे सीरम एका रिकाम्या बाटलीमध्ये भरून ठेवून द्या. दररोज आंघोळ केल्यानंतर स्किनवर हे सीरम अल्पाय करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईलच पण त्याचबरोबर त्वचेच्या समस्याही दूर होतील.