Crack heel winter : हिवाळ्यात अनेकांना टाचांना भेगा पडण्याची आणि मास निघण्याची समस्या होत असते. टाचांना भेगा पडणं ही एक वेदनादायी समस्या आहे. अनेकांना तर व्यवस्थित चालण्यासही त्रास होतो. अशात लोक वेगवेगळे क्रीम लावतात किंवा औषधं घेतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं काही घरगुती उपाय करूनही टाचांना पडलेल्या भेगा दूर करता येतात. असेच काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टाचांना भेगा पडू नये यासाठी उपाय
१) खोबऱ्याच्या तेलाने टाचांना पडलेल्या भेगाही दूर करण्यास मिळते. रात्री झोपताना पायांना तेल लावून झोपावे. याने पायांची त्वचा मुलायम होईल. तसेच तुम्ही ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता. ओटमील पावडरमध्ये जोजोबा ऑइल मिश्रित करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांना लावा. काही वेळाने पाय कोमट पाण्याने धुवावे.
२) कॉफी ग्राउंड्स टाचांची सूज दूर करते. तसेच वेदनाही कमी होतात. कॉफी ग्राउंड्समध्ये अॅंटी-इफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. ज्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या दूर होते. याने तळपायांना स्क्रब केल्याने त्वचेच्या टेक्सचरमध्येही सुधारणा होते.
३) मध सुद्धा त्वचेला मॉइश्चराइज करतं. पाय स्वच्छ करून रात्री झोपण्याआधी मध लावा, थोडावेळ ठेवा आणि नंतर पाय पाण्याने धुवावे. याने टाचेची त्वचा हायड्रेट राहते. तसेच बकेटीत थोडं पाणी घेऊन त्यात मध टाका. त्यात पाय ठेवा, काही वेळाने पाय टॉवेलने पुसून घ्या. असं नियमित करा.
४) बेकिंग सोड्याने पायांना स्क्रब करा. याने टाचांना पडलेल्या भेगांनी होणाऱ्या वेदना आणि सूज दूर होईल. पायांच्या बोटांमध्ये फंगसही होणार नाही.
५) मीठ जेवणाची टेस्ट तर वाढवतंच, सोबतच त्वचेसाठीही अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावरील अनेक घातक बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच त्वचेही ताजीतवाणी दिसते. अशात टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी देखील मिठाचा वापर करू शकता. अर्धी बकेट गरम पाण्यात थोडं मीठ टाका. काही वेळासाठी या पाण्यात पाय टाकून बसा. हा उपाय काही दिवस केल्यावर टाचांना भेगा पडण्याची समस्या दूर होईल.