गुटखा, सिगारेट, तंबाखू किंना दातांची योग्यप्रकारे स्वच्छता केली नाही तर दातांचा रंग काळा आणि पिवळा पडायला लागतो. त्यामुळे अनेकांना चारचौघात बोलण्याचीही लाज वाटायला लागते. त्यात त्याकडे फारसं लक्ष दिलं नाहीतर दात आणखी जास्त घाण दिसायला लागतात. पण दातांचे हे काळे किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ज्यांच्या मदतीने तुमचे दात चमकदार आणि स्वच्छ दिसतील.
या गोष्टींची घ्या काळजी
1) सर्वातआधी दातांना चमकवण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोनदा दातांची आणि जिभेची स्वच्छता करा.
2) जेवण झाल्यानंतर नेहमी गुरळा करा. खासकरुन जेव्हा तुम्ही गुटखा खाल्लेला असेल. अशावेळी गुरळा करताना दातांनरुन बोट फिरवा. असे केल्यास दातांवर डाग चिकटून राहणार नाहीत.
3) दातांचा वरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे दातांवर डाग जमा होणार नाहीत.
4) त्यासोबतच ब्रश करताना दात चमकण्यासाठी दातांवर बेकींग पावडर घासा. त्यामुळे तंबाखू, गुटख्याचे डाग कमी होण्यास मदत होईल.
5) दातांवरील जिद्दी डाग घालवण्यासाठी तुम्ही गाजर देखील वापरु शकता. रोज गाजर खाल्याने दात स्वच्छ राहतात. गाजरातील तंतू दातांमधील घाण साफ करण्यास मदत करतात.