सध्याच्या काळात प्रदुषण आणि विविध उत्पादनातून केल्या जात असलेल्या केमिकल्सच्या वापरामुळे अनेक महिलांना केस गळण्यापासून अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तसंच त्यामुळे आपण कमी वयातच वयस्कर दिसायला लागतो. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं आहेत. केस पिकल्यानंतर आपलं व्यक्तीमत्व व्यवस्थित दिसत नाही मग आपण त्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला सुरूवात करतो. तसंच केस काळे करण्याचा दावा करणारी महागडी उत्पादनं वापरण्यास सुरूवात करतो पण उत्पादनांच्या वापरामुळे केमिकल्सचा संबंध केसांशी होत असल्यामुळे केस तेवढ्यापुरती काळे दिसायला लागतात.
नंतर त्याच वेगाने केस पांढरे व्हायला सुरूवात होते. तुम्ही सुध्दा केस गळण्याच्या समस्येपासून हैराण झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांना काळेभोर बनवू शकता. या उपायांचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च करावा लागणार नाही. तुम्ही घरातील उपलब्ध असलेले साहित्य वापरून तुम्ही हे उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे उपाय.
काळीमिरी
केसांना काळ्या मिरीचे अनेक फायदे आहेत. त्यासाठी तुम्ही आधी काळ्या मिरिची पूड पाण्यात घालून उकळून घ्या. जेव्हाही तुम्ही केस धुवत असाल त्यावेळी शॅम्पू लावून झाल्यानंतर हे पाणी डोक्यावरून घाला . त्यामुळे केस पांढरे होण्यापासून रोखता येईल. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
कढी पत्ता
स्वयंपाक घरात असलेल्या कडीपत्त्याचा वापर करून तुम्ही केस पांढरे होण्यापासून रोखू शकता. त्यानंतर कढिपत्ता दोन ते तीन तासांसाठी भिजवत राहू द्या. त्यानंतर या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. तसंच कढिपत्त्याचा रस काढून त्याला नारळाच्या तेलात एकत्र करून घ्या. हे तेल केसांना लावल्याल फरक दिसून येईल तसंच केसांना पोषण मिळण्यास मदत होईल.
आवळा
आवळ्याचा वापर सौदर्य प्रसाधनात आणि केसांच्या उत्पादनात पुर्वापारपासून केला जात आहे. जेव्हा तुम्ही मेहेंदी लावता त्यावेळी त्यात आवळ्याची पावडर घाला. तसंच आवळ्याची पेस्ट करून केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल. जर तुम्ही आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचा रस नारळाच्या तेलात मिक्स करून लावाल तर फरक दिसून येईल.
कांदा
कांद्याची पेस्ट केसांसाठी गुणकारत ठरते. जर तुम्ही कांद्याचा सर किंवा काद्यांची जाडसर पेस्ट करून केसांच्या मुळांना लावाल तर समस्या नक्की दूर होईल. जर तुम्हाला कांद्याची पेस्ट लावण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. तुम्ही केसांवर कांद्याचा वापर करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर साल काढून मिक्समध्ये बारीक करून घ्या. आणि केसांना लावा. यामुळे केसांच्या मुळांना रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच केस पांढरे होणं थांबतं.