उन्हाळ्यात सगळ्यात जास्त उद्भवत असलेली समस्या म्हणजे घामोळ्या. वातावरणातील गरमीचं प्रमाण वाढलं की घामोळ्या शरीरावर घामोळ्या यायला सुरूवात होते. पाठीवर हातांवर, पायांवर, मानेवर, काखेत घामोळ्या जास्त येतात. तर काहीजणांचा चेहरा सुद्धा खराब झालेला असतो. पावसाळा आल्याशिवाय आराम मिळत नाही.
घाम बाहेर येऊ शकला नाही की त्वचेला सूज किंवा रॅशेस येतात त्यालाच घामोळे म्हणतात. त्वचेच्या रंगाचे, कधी लाल तर अतितीव्र झाल्यास पिवळ्या रंगाचे घामोळे येते.कोणत्याही केमिकल्सयुक्त क्रिम आणि पावडरचा वापर न करता तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला घामोळ्या घालवण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
बटाटा
बटाटा सगळ्यांच्याच स्वयंपाक घरात असतो. यासाठी तुम्हाला वेगळी मेहना घ्यावी लागणार नाही. फक्त कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण २० मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा तुम्हाला किराणामालाच्या दुकानात मिळू शकतो. बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घामोळ्या आलेल्या जागेवर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून चार वेळा केल्याने चांगले परिणाम मिळतात. (हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये स्मार्ट लूक आणि हवी तशी दाढी ठेवण्यासाठी, वापरा 'या' सोप्या ट्रिक्स)
मुलतानी माती
मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन घामोळ्या असलेल्या जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो. (हे पण वाचा-तुमच्यामुळे तुमची मुलंही होऊ शकतात थॅलेसेमियाची शिकार; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)