उन्हामुळे अनेकदा सन टॅनिंगची समस्या होते. त्याचा परिणाम चेहरा, हात यांसोबतच पायांवरही होतो. सूर्याच्या घातक किरणांमुळे स्किनवर मृत पेशी जमा होतात. त्यामुळे हे काळे दिसू लागतात. तसेच हे दिसायलाही फार खराब दिसतं. त्यामुळे आपल्या आवडीचे कपडे किंवा हिल्स घालणं शक्य होत नाही. पेडिक्योर केल्याने पायांचा रंग पुन्हा परत मिळवता येतो. परंतु, पार्लरमध्ये तासंतास वेळ वाया घालवण्यापेक्षा घरच्या घरीही तुम्ही तुमच्या पायांना झालेलं सन टॅनिंग दूर करू शकता.
संत्र्याची साल आणि दूध
संत्र्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. जे पायांचे डाग नाहीसे करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच दूधामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. जे पायांवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतं.
पॅक तयार करण्याची पद्धत
सर्वात आधी संत्र्याची साल उन्हामध्ये वाळवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या मदतीने बारिक पावडर करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे दूध मिक्स करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. 20 ते 25 मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.
लिंबू आणि मध
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आढळून येतात. तर मध पायांना मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं. या पॅकमुळे पायांवर जमा झालेले टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
पॅक तयार करण्याची प्रक्रिया -
1 चमचा लिंबाच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करा. तुम्हाला शक्य असल्यास त्यामध्ये थोडी मिल्क पावडर मिक्स करा. ही पेस्ट 20 मिनिटांपर्यंत पायांना लावा. त्यानंतर गरम पाण्याने धुवून टाका. त्यानंतर घरातून बाहेर पडताना पायांनाही सनस्क्रिन लावा.