(Image Credit : www.rewardme.in)
धूळ, बदलतं वातावरण, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, पोषक तत्वांची कमतरता अशा काही कारणांमुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केसांची सुंदरता अबाधीत ठेवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असते. केस तुटणे ही समस्या अलिकडे फार वाढत आहे. त्यावर काही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर केली जाऊ शकते.
१) केसांची चमक कायम ठेवण्यासाठी शॅम्पू केल्यानंतर केसांवर चांगल्याप्रकारे पाणी टाका, जेणेकरुन केसांमध्ये डोक्याच्या त्वचेवर शॅम्पू जराही राहू नये. त्यानंतर कंडिश्नर करा.
२) केस कोरडे झाल्यानंतर कंगव्याने केस नीट करा. याने मसाजही होईल आणि नैसर्गिक ऑइलही निर्मित होईल. नैसर्गिक तेल केसांच्या विकासासाठी महत्वाचं आहे.
३) एसी ऑफिसमध्ये बसून आणि नंतर बाहेर आल्यावर गरमीमुळे डोक्याच्या त्वचेवर खाज येते. हे ड्रायनेसचे संकेत आहे. असे झाल्यास अॅंटी डॅंड्रफ शॅम्पूचा वापर करा. जर केवळ कोरडेपणा असेल तर हायड्रेटिंग शॅम्पूचा वापर करा.
करा हे घरगुती उपाय
१) उडदाच्या डाळीची पेस्ट
उडदाची साल नसलेली डाळ शिरवून पेस्ट तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट केसांच्या मुळात लावा. असे लागोपाठ काही दिवस केल्यास केसांची चांगली वाढ होते.
२) हिरव्या धन्याची पेस्ट
हिरव्या धन्याची पेस्ट तयार करुन ती डोक्याच्या त्वचेवर लावा. याने केस पुन्हा येतील. असे लागोपाठ एक महिना करत रहावे. याने नवीन केस येण्यास मदत होईल.
३) केळी आणि लिंबू
केळीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस घाला. ही पेस्ट डोक्यावर लावल्यास केसगळती कमी होते. नवीन केस येण्यासही याने मदत होते.
४) कांद्या आहे फायदेशीर
एक मोठा कांदा घेऊन त्याने दोन तुकडे करा. डोक्याच्या ज्या भागातील केस गेले आहेत तिथे कांदा मिनिटे घासा. असे काही दिवस केल्यास केसगळती थांबेल.
(हे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण काहींना वरील गोष्टींची अॅलर्जीही असू शकते. त्यामुळे त्यांना याचे नुकसानही होऊ शकतात)