(Image Credit : thezoereport.com)
ऑयली स्कीन असलेल्या महिलांना स्वतःच्या त्वचेची जास्त काळजी घेणं भाग असतं. कोणताही ऋतू असला तरीदेखील त्वचेचा तेलकटपणा काही केल्या कमी होत नाही. तसेच अशा त्वचेवर पिम्पल्सही अधिक येतात. त्यांच्या त्वचेवर मेकअपही जास्त वेळ राहत नाही. इतर स्कीन टाइप असलेल्या लोकांपेक्षा ज्यांची स्कीन ऑयली आहे त्यांनी आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करणं अनेकदा महागातही पडतं. अशातच जाणून घेऊयात ऑयली स्कीनची काळजी घेण्यासाठीच्या काही टिप्सबाबत...
(Image Credit : homeguides.sfgate.com)
- पुदिन्याच्या पानांचा टोनर म्हणून उपयोग करता येऊ शकतो. हे त्वचेच्या मृत पेशी स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. पुदिन्याच्या पानांमध्ये गरम पाणी टाकून काही वेळासाठी तसचं ठेवा. जेव्हा हे थंड होईल त्यावेळी याच मिश्रणाने चेहरा स्वच्छ करा. कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहरा स्वच्छ करा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या.
- कोरफडची काही पानं घेऊन त्यातील गर काढून घ्या. तुम्ही बाजारातून जेलही विकत घेऊ शकता. हे काही वेळासाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. कोरफडीचं जेल चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाजही करू शकता. याने चेहऱ्यावरील डागही दूर होण्यास मदत होते. पण हे नियमित करावं लागले.
(Image Credit : Social Media)
- ऑयली स्कीन असलेल्यांनी बर्फाच्या थंड पाण्याचा वापर करणंही फायदेशीर ठरतं. यामुळे फक्त चेहरा हायड्रेट होत नाही तर चेहऱ्यावरील डाग आणि पुरळही दूर होण्यास मदत होते. त्वचेवर ग्लो आणण्यासाठीही चेहऱ्यावर बर्फाने मसाज करणं हा उत्तम पर्याय आहे.
- 10 बदाम पाण्यामध्ये भिजवून बारिक करून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. जवळपास 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
(Image Credit : bebeautiful.in)
- टॉमेटोच्या रसामध्ये 3 मोठे चमचे तांदळाचे पीठ आणि 1 चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर टॉमेटोची स्लाइस घेऊन चेहऱ्यावर मसाज करा.