सध्या लॉकडाऊनमुळे पार्लर सलून बंद आहेत. मग घरच्याघरीच आपल्याला त्वचेची आणि केसांची काळजी घ्यावी लागणार. खासकरून पुरुषांना दाढी करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी सलूनमध्ये जावं लागतं. काहीजणांना कितीही प्रयत्न केला तरी हवी तशी दाढी ठेवता येत नाही. मग जी आहे तीलाच शेप द्यायला लागतो. आज आम्ही तुम्हाला दाढी वाढवण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. लॉकडाऊनमध्ये तुम्ही तुमच्या लूकची काळजी चांगल्याप्रकारे घेऊ शकता
संतुलित आहार
आहारात प्रोटिन्स युक्त पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे दाढी वाढण्यासाठी मदत होईल. कारण प्रोटिन्सच्या सेवनाने केसांची वाढ चांगली होते. त्यासाठी आहारात अंडी, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. याशिवाय अवॉकॅडोचा सुद्धा वापर करू शकता. धुम्रपान ,मद्यपान करू नका. कारण त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते.
त्वचा चांगली ठेवा
स्वच्छ आणि चांगल्या त्वचेवर हेअर ग्रोथ सुद्धा चांगली होते. त्यासाठी त्वचेला मॉईश्चराईज करा. घरच्याघरी आठवड्यातून एकदा फेशिअल करा. त्वचेवर डर्ट असली कि दाढी वाढणे कठीण असते अशा परिस्थितीत नियमित चेहरा साफ ठेवणे गरजेचं असते. बाहेरून आल्यावर किंवा घरी असाल तरी चेहरा स्वच्छ धुवावा जेणेकरून त्वचा चांगली राहून दाढी वाढण्याला मदत होईल.
चांगली झोप
शरीराच्या विकासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ७ ते ८ तास झोपा. तसंच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कारण पाण्याची कमतरता असेल तर शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे दाढीची चांगली वाढ होऊ शकतं नाही. शरीराला डिहाड्रेट होऊ न देता जास्तीत जास्त पाण्याचें सेवन करत असाल तर तुम्हाला दाढी वाढवण्यासाठी कोणतीही समस्या येणार नाही. ( हे पण वाचा-या' कारणांमुळे पुरुषांना दाढी वाढवण्यासाठी परफेक्ट आहे लॉकडाऊन...)
इन्ग्रोथ केसांची काळजी घ्या
नियमित दाढी केल्याने चांगली दाढी येते हा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये असतो. जोपर्यंत गरज येत नाही तोपर्यंत दाढी करणे टाळले पाहीजे. कारण इन्ग्रोथ असलेले केस सतत काढल्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. तसंच सतत टेंशनमध्ये राहणे हे सुद्धा दाढी न वाढण्याचे एक कारण आहे. म्हणून दाढीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ताण-तणावापासून लांब रहा. ( हे पण वाचा-फक्त 'या' ट्रिक्स वापरून पुरूषांना लॉकडाऊनमध्येही केसांचं सौंदर्य येईल खुलवता)