त्वचा सुंदर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारतली वेगवेगळ्या कंपन्याची सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे त्वचा निस्तेज झालेली असते. आपल्याला नेहमी फिरायला जातानाच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा खास स्पेशल दिसायचं असतं. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक बद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवू शकता. घरच्याघरी हे फेसपॅक तुम्ही काही मिनिटात तयार करू शकता.
(image credit-punicamakeup.com)
ग्रीन टी आणि मधाचा फेस पॅक
१ कप ग्रीन टी आणि २ चमचे तांदळाचं पीठ आणि १ चमचा मध हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर २० मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवा. मग त्वचेला लावून मालिश करा. या फेसपॅकने मालिश केल्यास त्वेचवरच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. तसंच यात एन्टी ऑक्सिडट्स असतात. त्यामुळे त्वचेला ग्लो येईल. आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकण्यासाठी हा फेसपॅक उपयुक्त ठरतं असतो.
हळद आणि टॉमॉटोचा फेसपॅक
(image credit- urbanclap)
हळद आणि टॉमॅटोचा फेसपॅक तयार करण्यासाठी हळद आणि टॉमॅटो एका भांड्यात घेऊन पेस्ट तयार करून घ्या. नंतर ही पेस्ट त्वचेला लावा. ही पेस्ट सुकण्यासाठी १५ ते २० मिनिट वाट पहा त्यानंतर चेहरा धुवून टाका. रात्री झोपण्यापुर्वी हा फेसपॅक लावाल तर अधिक चांगला रिजल्ट येईल. ( हे पण वाचा-चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी आंघोळीच्या पाण्यात टाका दूध, मग बघा कमाल! )
ओट्स आणि लिंबाचा फेसपॅक
(image credit-mentalfloss)
हा फेसपॅक त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं असतो. यासाठी सगळ्यात आधी ओट्स बारीक वाटून घ्या. आणि त्यात लिंबू घाला. मग हा फेसपॅक चेहरा आणि मानेच्या त्वचेला लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिट वाट पहा . त्यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. ( हे पण वाचा-पिंपल्सचं टेन्शन नेहमीसाठी दूर करायचंय? ओल्या हळदीचा वापर ठरेल सगळ्यात बेस्ट उपाय)