(image credit- scoop.it, pepnews)
उन्हाळा सुरू झाल्यामुळे गरमीचं वातावरण वाढत चाललं आहे. वाढत्या उष्णतेत त्वचेच्या समस्या वाढतात. तुम्ही बाहेर उन्हात जात असाल किंवा जात नसाल तरी घरी बसल्या त्वचेवर परिणाम होऊन काळपटपणा येतो. त्याला सनबर्न किंवा सनटॅन म्हणतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी या टिप्स वापरून स्वतःची त्वचा चांगली ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. सध्या घरच्याघरी मोकळा वेळ मिळत असल्यामुळे तुम्ही तुमच्या आईची, बहिणीची किंवा पत्नीची मदत घेऊ शकता.
पुदिना फेसपॅक
पुदिना पचनक्रिया शरीरात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच चेहऱ्यासाठीही चांगला आहे. त्यामुळे पुदिन्याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्येही करतात. त्यासाठी पुदिना आणून तो सुकवून त्याची पूड करुन घ्या ज्यावेळी तुम्हाला फेसपॅक तयार करायचा असेल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये थोडी हळद आणि लिंबू पिळा. हा पॅक त्वचेला लावल्याने तुम्हाला तुमची त्वचा एकदम मुलायम झाल्यासारखी वाटेल.
बेसन पीठ
बेसनाचे त्वचेसाठी असलेले फायदे तुम्हाला माहीतच असतील. बेसनात दूध, हळद, मध घालून हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावा. ५ मिनिटांनंतर हे मिश्रण लावून मसाज करा. १५ ते २० मिनिटांनंतर सुकल्यानंतर हे मिश्रण धुवून टाका.
मुलतानी माती
अर्धा चमचा संत्र्याचा रस, त्यात ४ ते ४ थेंब लिंबाचा रस थोडी मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि थोडे गुलाबजल मिसळून थोडया वेळ फ्रिजमधे ठेवावे आणि नंतर चेह-याला लावा, १५ ते २० मिनीटांनी पाण्याने चेहरे स्वच्छ धुवावा. ( हे पण वाचा-घरी शेविंग करताना सर्वाधिक पुरूष करतात 'या' चुका, परफेक्ट शेविंगसाठी खास टिप्स)
मसुरची डाळ
मसूर डाळीला टोमॅटोचा रस आणि कोरफडीसोबत एकत्र करून एक घट्ट पेस्ट तयार करा. तयार पॅक चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे थंड पाण्याने धुवून टाका. बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून दोन वेळा लावा. ( हे पण वाचा-अंघोळ झाल्यानंतर 'या' चुका केल्यामुळे वयाआधीच दिसत आहात म्हातारे, वाचा कोणत्या...)
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)