उन्हाळा येताच चाहूल लागते ती फळांच्या राजाच्या आगमनाची. आंबा चवीष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी आणि त्वेचासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आंबा त्वचा उजळवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. याव्यतिरिक्त प्रखर उन्हामुळे झालेल्या टॅनिंगच्या समस्येवर अत्यंत फायदेशीर ठरतो. आंब्यामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट्स त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मजत करतात आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत.
मँगो फेस मास्क
चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येचा प्रत्येकालाच सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये पिंपल्सच्या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. त्यासाठी तुम्ही कैरीच्या ज्यूसचं सेवन करू शकता. कैरीचा ज्यूस एस्ट्रीजेंटच्या रूपामध्ये पिंपल्स हटवण्यासाठी मदत करतो. याव्यतिरिक्त सुरकुत्या दूर करण्यासाठीही मदत होते. पिंपल्सच्या समस्येपासून सटका करून घेण्यासाठी असा तयार करा मँगो फेस मास्क...
फेस मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे आंब्याचा पल्प, एक चमचा मुलतानी माती आणि थोडसं गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. हा तयार फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. सुकल्यानंतर हे चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. मँगो फेस मास्कचा वापर केल्याने पिंपल्सपासून सुटका होते. आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेचं तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.
(Image Credit : medicalnewstoday.com)
जाणून घ्या इतर फायदे :
1. जर त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या असतील तर आंबा आणि मध एकत्र करून तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावा. आंबा आणि मधामध्ये त्वचा उजळवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक तत्व असतात. तुम्ही आंब्याचा गर, मध आणि बदामाचं तेल एकत्र करून तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता.
2. ब्लॅकहेडच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी आंब्याचा पल्प, मिल्क पावडर आणि मध एकत्र तयार करून स्क्रब तयार करा. त्यानंतर हे चेहऱ्यावर लावा.
3. मँगो मास्कचा वापर केल्यानंतर तुम्हाला फ्रेश लूक मिळण्यास मदत होते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी आंब्याचा पल्प, ओट्स, मध आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.