त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि त्वचेला उजाळा देण्यासाठी महिला अनेक नवनवीन उपाय करत असतात. परंतु अनेकदा हे सर्व उपाय निष्फळ ठरतात. सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी फक्त हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइलची गरज नसते, तर त्वचेची काळजी घेण्यासाठी काही एक्स्ट्रा उपायांचीही गरज असते. बाजारात अनेक प्रोडक्ट उपलब्ध असतात. जे त्वचेवरील डाग दूर करून त्वचेचा रंग उजळवण्याचा दावा करत असतात. परंतु, ते सर्व प्रोडक्ट एवढे परिणामकारक नसतात, जेवढे घरगुती उपायांचा परिणाम दिसून येतो. त्वचेचा रंग उजळवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा फेसपॅक एकदम परफेक्ट ठरतं. परंतु फेसपॅख कसा तयार करावा आणि कसा लावावा, हेदिख माहीत करून घेणं आश्यक आहे. जाणून घेऊया तांदळाच्या पिठाचा फेसपॅक कसा तयार करावा त्याबाबत...
तांदूळ आणि कच्चं दूध
तांदळाचा फेसपॅक तयार करण्यासाठी 4 चमचे तांदूळ घ्या आणि त्यांना 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवा आणि त्यानंतर याममध्ये 4 ते 5 चमचे कच्चं दूध एकत्र करून जाडसर बारिक करा. आता संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या आणि 1 तासांसाठी चेहऱ्यावर असचं ठेवा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक आठवड्यातून कमीत कमी 3 दिवसांसाठी लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला परिणाम दिसून येतील.
तांदळाचं पिठ, मध आणि लिंबू
तांदळाचं पिठ डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करतं. यासाठी 4 चमचे तांदूळ भिजवून जाडसर वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडसं मध आणि लिंबू एकत्र करा. आता चेहऱ्यावर लावा आणि एका तासानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत होते आणि चेहरा रिफ्रेशिंग आणि यंग दिसू लागतो.
तांदळाचं पिठ आणि दही
तांदळामध्ये अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन्स असतात. जे स्किन व्हाइटनिंगचं काम करतात. एवढचं नाही तर त्वचेचं धूळ, माती आणि प्रदूषणापासून रक्षण करतात. त्वचा उजळण्यासाठी तांदूळ जाडसर वाटून त्यामध्ये मध आणि तीन चमचे दही एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्या आणि चेहऱ्यावर लावा. अर्धा तासासाठी चेहऱ्यावर असचं ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत चेहऱ्यावरून काढून टाका. 5 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
त्वचेसाठी तांदळाच्या पिठाचे फायदे :
- तांदळामध्ये फेरूलिक अॅसिड (Ferulic acid) आणि ऐलनटॉइन (allantoin) असतं. जे त्वचेसाठी उत्तम सनस्क्रिन ठरतं. यामध्ये अॅन्टी-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टिज असतात. ज्या सनबर्नपासून वाचवतात आणि टॅनिंगही दूर करतं. - तांदळाच्या पिठाला फेस पावडर म्हणूनही वापरता येऊ शकतं. यामध्ये अस्तित्त्वात असलेली तत्व चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल शोषून घेतात. ज्यामुळे स्किन ऑइल नसतं आणि यामुळे पिंपल्सची समस्याही होत नाही.
- तांदळाचं पिठ सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स दूर ठेवण्यासाठी आणि त्वचेचा उजाळा वाढविण्यासाठी मदत करतात.
- तांदळाचं पिठ त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करतं आणि डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.