मेंदू कसा थांबवितो गरज नसलेल्या सूचना !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 11:09 AM
कधी आपण विचार केला आहे का? की, आपला मेंदू खूप गोंगाट असलेल्या कॅफेमध्ये आपण पुस्तक वाचताना कानात येणारा गरज नसलेल्या आवाजाला थांबवून आपल्याला पुस्तकाच्या पानावर एकाग्र करतो.
कधी आपण विचार केला आहे का? की, आपला मेंदू खूप गोंगाट असलेल्या कॅफेमध्ये आपण पुस्तक वाचताना कानात येणारा गरज नसलेल्या आवाजालाही थांबवून आपल्याला पुस्तकाच्या पानावर एकाग्र करतो. एका संशोधनानूसार असे समजले आहे की, हे मेंदूतील इनहिबिटरी न्यूरॉन्समुळे हे शक्य आहे. संशोधनात हे म्हटले आहे की, इनहिबिटरी म्हणजेच थांबविणारे न्यूरॉन्स ट्राफिक पोलिसांप्रमाणेच काम करतात, जे योग्य पद्धतीने मेंदूच्या प्रतिक्रियांना सुनिश्चित करतात. तसेच येणाºया सूचनांमधून गरज नसलेल्या सुचनांना न्यूरॉन्स दाबून टाकतात आणि मेंदूची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी उत्तेजित सूचनांना संतूलित करण्याचे काम करतात. न्यूयॉर्क विश्वविद्यालयचे प्रोफेसर तथा वरिष्ठ लेखक जिओ-जिंग वांग सांगतात की, आमच्या संगणीकृत नमुन्यानूसार इनहिबिटरी म्हणजेच थांबविणारे न्यूरॉन्स असे तंत्रिका सर्किट निर्माण करण्यासाठी सक्षम आहेत, जे की आवश्यक सूचनांना विशेष मार्ग दाखवितात आणि बाकीच्या सूचना थांबवून ठेवता. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे न्यूरॉन्स फ क्त बाहेरुन येणाऱ्या सर्व सूचनांवरच नियंत्रण ठेवत नाही, तर स्वत:चा आपला मार्गही दर्शवितात.