चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये ओठांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. महिला आपल्या ओठांचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतात. ओठांना गुलाबी लूक देण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे लिपस्टिक्स उपलब्ध असतात. परंतु खरं तर अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण एखाद्या महागड्या ब्रँडची आपल्याला आवडलेली लिपस्टिक विकत आणतो. पण ती ओठांवर लावल्यावर समजतं की, हा कलर आपल्याला सूटच होत नाही.
खरं तर प्रत्येक स्किन टोनवर पिंक शेड सूट होतोच असं नाही. बाजारात अनेक प्रकारचे पिंक शेड उपलब्ध असतात. परंतु त्यापैकी तुम्हाला फक्त तोच कलर निवडायचा असतो, जो तुमच्यासाठी परफेक्ट असेल. या समस्येपासून सुटका करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार, योग्य पिंक शेडची निवड करू शकता.
फेअर आणि पेल स्किन टोन
फेअर आणि पेल स्किन टोन असणाऱ्या महिलांनी पिंक शेड निवडताना ज्यामध्ये ब्ल्यू अंडरटोन असेल त्या शेडची निवड करावी. जसं कॅन्डी पिंक, बबलगम पिंक आणि मॉव पिंक इत्यादी. हे पिंक शेड्स फेसवर सूट करतील आणि तुम्हाला परफेक्ट पिंक लिप्स मिळण्यास मदत होइल.
मीडियम किंवा ऑलिव्ह स्किन टोन
ज्या महिलांचा स्किन टोन मीडिअम फेअर किंवा ऑलिव्ह असतो. त्यांनी ऑरेंज अंडरस्टोन असणाऱ्या पिंक शेडचा वापर करावा. अशाप्रकारे पिंक शेड्समध्ये बेरी पिंक, कॅरेमल पिंक आणि वाइन पिंक या शेड्सचाही वापर करू शकता.
डार्क कॉम्प्लॅक्शन
जर तुमचा स्किन टोन डार्क कॉम्प्लॅक्शन आहे आणि तुम्हाला लोक पिंक कलरची लिपस्टिकपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतील तर त्यांचं ऐकू नका. लिप कलरची निवड करताना थोडी काळजी घ्या. डार्क स्किन टोनवर पिंकचे ते शेड चांगले दिसतात. ज्यांमध्ये पर्पल अंडरस्टोन असतात. त्यामुळे आता तुम्ही बिनधास्त पिंक शेड वापरू शकता.