शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घरच्या घरी केस रंगवण्याचे ‘6’ नैसर्गिक व सुरक्षित उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:51 AM

टाळूवरील त्वचा ही अत्यंत नाजूक व संवेदनशील असल्याने केमिकलयुक्त रंगाचा केसांवर व  शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो. म्हणूनच नैसर्गिक रंगांची निवड करणे हितकारी आहे.

(Image Credit : Youtube)

सध्याच्या जीवनशैलीमुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या आढळून  येत आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून बचावणे कठीण असले तरीही केसांना रंग दिल्याने ते लपवले जाऊ शकतात. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुकत रंगांमुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील तितकीच आहे. टाळूवरील त्वचा ही अत्यंत नाजूक व संवेदनशील असल्याने केमिकलयुक्त रंगाचा केसांवर व  शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो. म्हणूनच नैसर्गिक रंगांची निवड करणे हितकारी आहे.

हीना 

हीना किंवा मेहंदी त्वचेवर किंवा केसांवर लावल्यास, ते लाल किंवा चॉकलेटी रंगाचे होतात. काळे केस, पांढरे झाले असल्यास हीनाच्या पावडरमध्ये थोडे तीळाचे तेल व कढीपत्ता एकत्र करून लावल्यास फायदा  होतो.

कसा बनवाल डाय?

थोडे तिळाचे तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने टाकून तेल हवाबंद  ड्ब्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला केस रंगवायचे असतील तेव्हा त्यात हीनाची पावडर टाकून काही मिनिटांसाठी तेल गरम करून घ्या. मिश्रण थंड होईपर्यंत थांबा व त्यानंतर पेस्ट केसांवर किमान 3-4 तास राहू द्या. त्यानंतर केस शिकाकाईने धुवून टाका.

जर तुम्हाला केसांना लालसर रंग  हवा असेल तर  हीनाच्या पावडरमध्ये बीटाचा रस मिसळून ती पेस्ट केसांवर लावा.जर तुम्हाला केस तांबूस रंगांनी रंगवायचे असल्यास,  हीनाची पावडर , लिंबाचा रस व दही यांचे एकत्र मिश्रण करून त्यात थोडा चहाचा अर्क टाकून केसांना लावा.

हीना केसांना लाल रंग  देते  तर नीळ  टाकल्याने  केसांना निळा रंग मिळू शकतो. मात्र  हीना  व  नीळ  एकत्र  केल्याने  तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या  विविध छटा  मिळू  शकतात. जर तुम्हाला केस लालसर रंगात हवे असल्यास हीना पावडरचे प्रमाण अधिक ठेवा. तर चॉकलेटी अधिक प्रमाणात करायचे असल्यास नीळ अधिक टाका.

चहा आणि कॉफी 

चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये केस  रंगवण्याची व अधिक तपकिरी करण्याची क्षमता  आहे. मात्र त्यासाठी चहा व कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा. व ते  गरम पाण्यात मिक्स करून त्याचा वापर करा.दाट कॉफीदेखील फार उपयुक्त आहे. कॉफी पाण्यात उकळून ते मिश्रण केसांना लावल्यास गडद तपकिरी रंग मिळेल. यासाठी चहा किंवा  कॉफीच्या पाण्यात केस बुडवून ठेवा. कॉफी डाय बनवण्याचा सोपा मार्ग म्हणजे कॉफी  काही हेअर कंडीशनरसोबत मिक्स करा व केसांना लावा.

आवळा

आवळ्यात केसांना रंग देण्याची क्षमता नाही. मात्र आवळ्यामुळे केसांना चकाकी येते. त्यामुळे केसांना रंग लावण्याचा प्रक्रियेत अंतिम टप्प्यात  आवळ्याची पावडर  टाकावी. यामुळे रंग केल्यानंतर तुमच्या केसांना चकाकी येईल.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स