(Image credit -india.com)
सुंदर त्वचा सगळ्यानांच हवी असते, त्यासाठी पार्लरला जाण्यापासून महागडी उत्पादनं घेण्यापर्यंत महिला वेगवेगळे उपाय करत असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का. घरच्या घरी कॉफीचा वापर करुन तुम्ही चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवू शकता. तर मग जाणून घ्या कॉफीचा वापर करून कसा करायचा चेहरा टवटवीत. याचा वापर करून तुम्ही उजळदार आणि सुंदर त्वचा मिळवू शकता.
(Image credit-Savvy nutralista)
कॉफी योग्य पोषण देते. तुम्हाला नेहमी सुंदर आणि निरोगी दिसायचं असेल तर कॉफी फायदेशार ठरेल. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमची त्वचा तरूण दिसण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या सुंदर चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी स्क्रब म्हणून तुम्ही कॉफीचा वापर करू शकता.
( Image credit-Hair,skin,nails,blog)
कॉफी पावडरमध्ये पाण्याचे काही थेंब घाला. व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करा ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा साधारण 20 मिनिट्सने चेहरा थंड पाण्याने धुवा. अेस केल्यास महागडा फेशीयल कीट न वापरता तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता.कॉफीमुळे तुमचा चेहरासुद्धा फ्रेश होतो. कॉफी ही चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. याची पेस्ट लावल्याने चेहरा मुलायम होतो तसंच चेहऱ्याला कांती येते. बॉडी स्क्रब म्हणूनही तुम्ही कॉफीचा उपयोग करू शकता.
( Image credit-Inat.com)
कॉफीने त्वचेत रक्ताभिसरण होण्यास मदत मिळते. आणि पेशींचा विकासही होतो. यातील तत्त्व चेहऱ्यासाठी स्क्रबचं काम करतात. तसेच कॉफी एक चांगलं एक्सफोलिएटर सुद्धा आहे. ज्याने डेड स्कीन दूर करण्यासही मदत मिळते. त्यासोबतच कॉफी त्वचा डॅमेज होण्यापासूनही वाचवते. आणि सूर्याच्या घातक किरणांपासूनची त्वचेची सुरक्षा करते.