सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत प्रदुषणांमुळे महिलांच्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम घडून येत असतो. तसंच सारखं सारखं पार्लरला जाऊन खर्च करणं हे त्रासदायक ठरत असतं. अनेकदा महिलांना पार्लरमध्ये जाऊन सुध्दा हवी तशी समाधानकारक त्वचा मिळतं नाही. पण ऑफिसला जाताना प्रत्येकालाच स्पेशल दिसायचं असतं. त्यासाठी चेहरा तजेलदार असणं आवश्यक असतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर घरगुती वापरात असलेल्या मसुरच्या डाळीचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता आणि जास्त खर्च सुध्दा करावा लागणार नाही. चला चर मग जाणून घेऊया मसुरच्या डाळीचा वापर करून कशाप्रकारे त्वचेला सुंदर बनवू शकता.
मसुरच्या डाळीचे अनेक फायदे असल्यामुळे आपण मसुरच्या डाळीचा आहारात समावेश करतो. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसुर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. त्यामुळे वजन कमी करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी मसुरच्या डाळिचे सेवन करावे. त्याशिवाय त्वचेसाठी गुणकारक ठरलेल्या मसुरच्या डाळीचा फेसपॅक कसा तयार करायचा जाणून घ्या.
हा फेसपॅक तयार करण्यासाठी मसुरची डाळ रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातले पाणी काढून घ्या. मग त्या डाळीची पेस्ट करुन घ्यावी. या पेस्टमध्ये ५ चमचे कच्चे दूध मिसळावे. हे चेहऱ्याला लावल्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. यामुळे टॅनिंग दूर होऊन त्वचा घट्ट होते आणि सुरकूत्याही जातात. हा प्रयोग आठवड्यातून दोनवेळा करावा यामुळे त्वचा मऊ मुलायम होते.
(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)