आपण मुळ्याचा वापर आपण अनेकदा खाण्यासाठी भाज्यांमध्ये आणि सॅलेडमध्ये करत असतो. मुळ्याचा आहारात समावेश करणं खूप उत्तम असतं. अनेक आजारांवर उपाय म्हणून मुळ्याचा आहारात समावेश करावा. मुळ्यातील पोषक तत्व शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतात. मुळ्यात असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, झिंक व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात. यामध्ये भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.
त्वचेवर आणि केसांच्या अनेक समस्यांवर गुणकारी असा मुळा आहे. चला तर मग जाणून घेऊया मुळ्याचं सेवन करण्याचे तसंच त्वचेच्या दृष्टीने काय आहेत फायदे. त्वचा चांगली होण्यासाठी कायम सगळे प्रयत्नशील असतात. मुळा किंवा त्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात आणि त्वचा उजळते. त्यामुळे मुळ्याचे सेवन करा.
त्वचेला होणारे मुळ्याचे फायदे
काळी वर्तुळं काढून टाकण्यासाठी फायदेशीर
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी
त्वचेला हाटड्रेट ठेवण्यासाठी
त्वचेला डिटॉक्सीफाय करते
पिंपल्सपासून सुटका
त्वचेत नैसर्गिक चमक
मुळ्यात असलेले फायबर्स तुमच्या शरीरातील टॉक्सिंसपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो.
असा तयार करा मुळ्याचा फेसपॅक
त्वचा आणि मुळ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुळ्याचा एक मोठा तुकडा घ्या. नंतर त्याची साल काढून चांगल्याप्रकारे वाटून पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये लिंबाचा रस घाला. ४ ते ५ थेंब राईंचं तेल घालून चांगलं मिक्स करून घ्या. तयार आहे तुमचा मुळ्याता फेसपॅक. हा फेसपॅक त्वचेला लावून काहीवेळाने धुवून टाका. ग्लोईंग स्किनसाठी हा प्रयोग उत्तम ठरेल. ( हे पण वाचा-दिसायचंय चिरतरुण?; मग 'या' पदार्थांपासून राहा सदैव दूर)
(image credit- wiser lifestyle)
या फेसपॅकला तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता. कच्च्या मुळ्याचा हा फेसपॅक वापरल्यामुळे तुमच्या त्वचेवल ग्लो येईल. मुळ्यापासून फेसपॅक तयार करून तुम्ही तुमची त्वचा चांगली ठेवू शकता. याचा वापर करून तुम्ही त्वचेवर ब्लीच सुद्धा करू शकता. फक्त जर तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर तुम्ही ब्लीच वापरू नका. किंवा डॉक्टरांच्या सल्लाने हा प्रयोग करा. (हे पण वाचा-शेविंगआधी हा फंडा वापराल, तर त्वचेवरची जळजळ कायमची विसराल अन् हॅण्डसमही दिसाल!)