शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

काही दिवसांतच अंडरआर्म्सचा काळपटपणा होईल दूर; वापरा 'या' घरगुती टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 1:34 PM

अनेक महिला आणि मुलींना अंडरआर्म्सच्या काळपटपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळेच अनेकदा स्लीवलेस ड्रेसना बायदेखील म्हणावं लागतं.

अनेक महिला आणि मुलींना अंडरआर्म्सच्या काळपटपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळेच अनेकदा स्लीवलेस ड्रेसना बायदेखील म्हणावं लागतं. अंडरआर्म्सचा कलर डार्क होण्यामागे अनेक कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि घरगुती टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही अगदी काही वेळातच अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करू शकता. 

अंडरआर्म्स कलर डार्क होण्याची काही कारणं  : 

  • वॅक्स करताना जास्त गरम वॅक्स वापर केल्याने
  • हेयर रिमूवल क्रीममध्ये असलेले केमिकल्स
  • अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेझरचा वापर करणं
  • हॉर्मोनल डिसबॅलेंस
  • जास्त टाइट कपडे वेअर करणं
  • डियोड्रंटचा जास्त वापर 
  • अंडरआर्म्स स्वच्छ न केल्यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणं

 

अशातच अंडरआर्म्सचा रंग उजळवण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय वापरणं ठरतं फायदेशीर : 

बहुउपयोगी लिंबू 

लिंबाचे अनेक फायेद आहेत. हे एक नॅचरल ब्लीच आहे, जे डार्क स्किन लाइट करण्याचं काम करतं. याव्यतिरिक्त हे डेड स्किन स्वच्छ करण्यासाठीही मदत करतं. नियमितपणे अंडरआर्म्सवर लिंबाचा रस लावल्याने काळपटपणा दूर होण्यास मदत होते. लिंबाचा रस लावल्यानंतर अंडरआर्म्स थंड पाण्याने धुवून टाका आणि मॉयश्चरायझर अप्लाय करा. काही दिवसांसाठी डिओड्रंट लावणं बंद करा. लिंबाच्या रसामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी डार्क कलर काढून टाकून त्वचेचा मूळ रंग परत मिळवण्यासाठी मदत करतो. 

बटाटाही करतो मदत 

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे बटाट्याचा वापर केल्याने तुमची अंडरआर्म्सची त्वचा नॅचरल पद्धतीने ब्लीच होण्यास मदत होते. बटाट्याचा रस किंवा तुकडे अंडरआर्म्सवर लावल्याने त्वचेवर तयार झालेले काळपटपणाचे पॅच काही दिवसांमध्येच दूर होतात. याव्यतिरिक्त तुम्ही बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून अंडरआर्म्सवर लावू शकता. 

बेकिंग सोडा ठरतो फायदेशीर 

अंडरआर्म्सच्या भागांमध्ये डेड स्किन सेल्स जास्त जमा होत राहतात आणि अंडरआर्म्सची त्वचेचा रंग डार्क होतो. बेकिंग सोडा पाण्यामध्ये एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्टच्या मदतीने अंडरआर्म्सवर स्क्रब करा. यामुळे अंडरआर्म्सची रोमछिद्र ओपन होतात आणि दुर्गंधीही दूर होते. तुम्ही बेकिंग सोड्यामध्ये खोबऱ्याचं तेलही एकत्र करून मसाज करू शकता. 

बेसन आणि दह्याची पेस्ट बेसन एक उत्तम स्क्रब आहे, जे त्वचेवरील डेड स्किन सेल्स दूर करून इव्हन टोनसाठी मदत करतात. दह्यामध्ये असलेलं लॅक्टिक अॅसिड त्वचेला कंडिशनिंग करण्यासोबतच सॉफ्टही करते. बेसन आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा. त्वचेचा रंग उजळवण्यास मदत होते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय