शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

व्हाइड हेड्स दूर करायचे आहेत?; 'हे' 5 घरगुती उपाय ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:48 AM

अनेकजण ब्लॅक हेड्सच्या समस्येने त्रस्त असतात. पण तुम्हाला माहीत आहे का?  ब्लॅक हेड्सप्रमाणे व्हाइट हेड्सही असतात. चेहऱ्यावरील त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तयार होतात.

अनेकजण ब्लॅक हेड्सच्या समस्येने त्रस्त असतात. पण तुम्हाला माहीत आहे का?  ब्लॅक हेड्सप्रमाणे व्हाइट हेड्सही असतात. चेहऱ्यावरील त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तयार होतात. यावर कोणताही उपाय करण्याआधी खात्री करणं अत्यंत आवश्यक असतं की, ते नक्की व्हाइट हेड्सच आहेत. व्हाइट हेड्सचा त्रास तेलकट त्वचा असणाऱ्यांना सहन करावा लागतो. अनेकदा हे एखाद्या संक्रमणामुळेही होतात. जर तुम्हीही व्हाइट हेड्सच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता. 

1. कॉर्न स्टार्च आणि व्हिनेगर 

कदाचित तुम्हाला माहित असेल की, व्हाइट हेड्स वाढल्याने पिंपल्सचाही धोका असतो. त्यामुळे त्वचेवरील एक्स्ट्रा ऑइल हटवण्यासाठी कॉर्न स्टार्च आणि व्हिनेगर अत्यंत उपयोगी ठरतो. कॉर्न स्टार्च तेलकटपणा शोषून घेतो. तर व्हिनेगर स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतो. तसेच हे दोन्ही पदार्थ अॅक्ने दूर करण्यासाठीही मदत करतात. 

आवश्यक साहित्य : 

  • 2 चमचे कॉर्न स्टार्च
  • 1 चमचा व्हिनेगर 

 

पेस्ट तयार करण्याची पद्धत : 

पेस्ट तयार करण्यासाठी 2 चमचे कॉर्न स्टार्च आणि 1 चमचा व्हिनेगर व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर प्रभावित त्वचेवर लावून 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. कोमट पाण्याच्या मदतीने चेहरा धुवून घ्या. उत्तम परिणामांसाठी दिवसातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. 

2. एग व्हाइट मास्क 

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. जे त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर हे आपल्या त्वचेला आतमधून क्लीन करतं आणि पोर्स टाइट करण्यासाठी मदत करतं. 

साहित्य : 

  • अंड्याचा पांढरा भाग 
  • काचेचा बाउल 
  • एग बिटर 

 

पेस्ट तयार करण्याची पद्धत : 

अंड्याचा पांडरा भाग एका बाउलमध्ये काढून घ्या आणि तो व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर चेहरा माइल्ड क्लिंजरच्या मदतीने स्वच्छ करा. त्यानंतर एका ब्रशच्या मदतीने तयार फेस मास्क आपल्या त्वचेवर लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, ही पेस्ट नाकाच्या आजूबाजूला व्यवस्थित लावा. कारण व्हाइट हेड्स नाकाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर असतात. हा मास्क अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर तसाच ठेवा. जेव्हा हे व्यवस्थित सुकून जाईल त्यानंतर खालून वरच्या दिशेले मास्क काढून टाका. मास्क काढल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

3. तांदळाचं पीठ 

तांदळाचं पीठ एक उत्तम एक्स्फोलिएटर असतं. हे व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी मदत करतं. तसेच यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. 

आवश्यक साहित्य : 

  • 1 कप कच्चे तांदूळ 
  • अर्धा कप दूध 

 

पेस्ट तयार करण्याची पद्धत : 

अर्धे शिजवलेले तांदूळ बारिक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर त्यामध्ये दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि व्यवस्थित मसाज करा. 15 मिनिट ठेवा आणि चेहरा धुवून टाका. 

4. मुलतानी माती 

मुलतानी माती तेलकट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. व्हाइट हेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. तुम्ही हा उपाय दररोज करू शकता. आवश्यक साहित्य : 

  • 2 चमचे मुलतानी माती 
  • पाणी 
  • लिंबाचा रस 

 

पेस्ट तयार करण्याची पद्धत : 

पेस्ट तयार करण्यासाठी सर्व गोष्टी एकत्र करून एक पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. जेव्हा पेस्ट सुकून जाईल त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

5. बेकिंग सोडा आणि मध 

बेकिंग सोडा तेलकट त्वचा एक्फोलिएट करण्यासाठी मदत करतो. तसेच मध त्वचा कोमल करण्यासाठी मदत करतं. जाणून घेऊया या दोन्ही पदार्थांपासून पेस्ट कशी तयार करायची त्याबाबत... 

आवश्यक साहित्य : 

  • 2 चमचे मध 
  • अर्धा चमचा बेकिंग सोडा

 

पेस्ट तयार करण्याची पद्धत : 

सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर हे आपल्या चेहऱ्यावर लावा आणि सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हातांनी रब करा. त्यांनतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स