अनेकांचे केस कुरळे आणि इतरांसारखे सहज मॅनेज होणारे नसतात. त्यामुळे अनेकजण वैतागलेले असतात. अशाप्रकारचे केस सांभाळणं किती कठिण असतं हे त्या लोकांनाच चांगलंच कळतं. अशात वेगवेगळे उपाय करुनही केस चांगले मुलायम होत नाहीत.
अनेक महिला स्पा आणि सलूनमध्ये जातात. तिथे त्या रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंगसारख्या केमिकल ट्रिटमेंटच्या मदतीने मुलायम आणि स्ट्रेट केस करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करतात. पण यासाठी जे केमिकल्स वापरले जातात ते त्वचेसाठी आणि केसांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्स वापरुन तुम्ही घरीच हेअर स्ट्रेटनिंग क्रीम तयार करु शकता.
साहित्य
१ कप नारळाचं दूध
२ चमचे ऑलिव ऑइल
२ चमचे लिंबाचा रस
३ चमचे कॉर्न स्टार्च
कसं कराय तयार?
एका पॅनमध्ये हलक्या आचेवर खोबऱ्याचं दूध गरम करा. त्यात ऑलिव ऑइल टाका. त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाका. गरम झालेल्या या मिश्रणात कॉर्न स्टार्च टाका आणि हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा. हलक्या हाताने हे फिरवत रहा. जेव्हा या मिश्रणाची घट्ट पेस्ट तयार होईल तेव्हा गॅस बंद करा आणि मिश्रण पॅनमध्येच थंड होऊ द्या. तुमची हेअर स्ट्रेटनिंगसाठी क्रीम पूर्णपणे तयार आहे.
कसा कराल वापर?
शॅम्पू आणि कंडीशनरने आधी केस चांगल्याप्रकारे धुवून घ्या. हेअर ड्रायरचा वापर करु नका. टॉवेलने केस कोरडे करा. जेव्हा केस थोडे भिजलेले असतील तेव्हा ही पेस्ट केसांना वरुन खाली अशाप्रकारे लावा. पेस्ट लावून झाल्यावर केस शॉवर कॅपच्या मदतीने झाकून ठेवा आणि दोन तासांसाठी तसंच ठेवा. दोन तासांनंतर केसांना शॅम्पू करा आणि कंडीशनिंग करा. हा उपाय दोन महिने आठवड्यातून दोनदा करा.
(टिप : हेअर स्ट्रेटनिंगच्या या घरगुती क्रीमने केस स्ट्रेट होतीलच असा दावा आम्ही करत नाही. केवळ माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्यामुळे याचा वापर करायचा असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)