हिवाळा येताच आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अशातच पायांची स्किन ड्राय होणं, क्रॅक हिल्स यांसारख्या अनेक समस्या पाहायला मिळतात. यापासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. परंतु यांचा परिणाम काही वेळासाठीच दिसून येतो. काही वेळानंतर पुन्हा पाय तसेच दिसू लागतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेप्रमाणेच पायांनाही स्क्रबिंग करणं गरजेचं असतं. ज्यामुळे पायाच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेचा ड्रायनेस निघून जातो. जाणून घेऊयात 4 होममेड फुट स्क्रबबाबत, जे तुमच्या पायांची स्किन सॉफ्ट आणि स्मूद बनवण्यासाठी मदत करतील.
1. पेपरमिंट फुट स्क्रब
साहित्य :
- 2 कप दाणेदार साखर
- 1/2 कप ग्रेप्स ऑइल
- 10 ते 12 थेंब पेपरमिंट एसेंशियल ऑइल
कृती :
- एका जारमध्ये साखर, ग्रेप्स ऑइल आणि पेपरमिंट एसेंशियल ऑइल एकत्र करून स्क्रब करा.
- तयार मिश्रण आपल्या पायांच्या ड्राय स्किनवर लावून व्यवस्थित स्क्रबिंग करा.
- त्यानंतर मॉयश्चरायझर लावून पायांमध्ये मौजे घाला.
- स्क्रबमधील साखर पायांच्या ड्राय स्किनला एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करेल.
- ग्रेप्स ऑइल स्किनला मॉयश्चराइझ करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
- पेपरमिंट एसेंशियल ऑइलमुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळतो.
2. रिफ्रेशिंग लेमन फुट स्क्रब
साहित्य :
- 2 कप साखर
- 1/4 खोबऱ्याचं तेल
- 6 ते 8 थेंब लेमन एसेंशियल ऑइल
कृती :
- बाऊलमध्ये साखर, खोबऱ्याचं तेल आणि लेमन एसेंशियल ऑइल एकत्र करून घ्या.
- त्यानंतर हे स्क्रब पायांवर लावा.
- आंघोळीपूर्वी हे स्क्रब करू शकता.
- त्यामुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळण्यासोबतच डेड स्किन सेल्स निघून जाण्यास मदत होईल.
3. पायांच्या भेगांसाठी मिल्क स्क्रब
साहित्य :
- 1 कप दूध
- 5 कप कोमट पाणी
- 4 टेबलस्पून साखर किंवा मीठ
- 1/2 कप बेबी ऑइल
- प्युबिक स्टोन
कृती :
- एका टबमध्ये एक कप दूध, 5 कप कोमट पाणी घ्या.
- आता या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी आपले पाय बुडवून ठेवा.
- एका बाउलमध्ये बेबी ऑइल आणि साखर किंवा मीठ एकत्र करा.
- पेस्ट पायांवर लावून स्क्रब करा. त्यानंतर प्युबिक स्टोनच्या सहाय्याने पायांवर मसाज करा.
- स्क्रब केल्यानंतर पायांवर मॉयश्चरायझर किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करा.
4. विनेगर फुट स्क्रब
साहित्य :
- गरम पाणी
- 2 टेबलस्पून व्हिनेगर
- मीठ
कृती :
- जर तुमच्या पायांमध्ये तुम्हाला थकवा जाणवत असेल तर त्यांना रिलॅक्स करण्यासाठी स्क्रब फायदेशीर ठरतं.
- एका भांड्यामध्ये गरम पाणी टाकून त्यामध्ये व्हिनेगर आणि थोडं मीठ टाका.
- आता या पाण्यामध्ये पाय 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवा.
- पाय सुकवून मॉयश्चरायझरचा वापर करा.