त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे मॉयश्चरायझर असतात. एवढचं नव्हे तर त्वचेच्या प्रकारानुसारही वेगवेगळे मॉयश्चरायझर बाजारात उपलब्ध असतात. याशिवाय इतर महागड्या मॉयश्चरायझर्सचाही वापर करण्यात येत असतो. पण बाजारात मिळणाऱ्या या केमिकल्समुळे अनेकदा त्वचेला इन्फेक्शन होण्याती शक्यता असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी मॉयश्चरायझर तयार करून लावू शकता. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तसेच त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत होईल. जाणून घेऊयात घरच्या घरी मॉयश्चराझर तयार करण्याच्या पद्धतीबाबत...
मध, ग्लिसरीन , लिंबाचा रस आणि ग्रीन टी :
एक चमचा मध, दोन चमचे ग्लिसरीन, दोन चमचे ग्रीन-टी आणि लिंबाचा रसाचे काही थेंब एका बाउलमध्ये एकत्र करून व्यवस्थित एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेच्या समस्याही दूर होतात.
खोबऱ्याचे तेल, व्हिटॅमिन-ई ऑइल आणि इसेंशिअल ऑइल :
मॉयश्चरायझर तयार करण्यासाठी अर्धा कप खोबऱ्याचं तेल, त्यामध्ये व्हिटॅमिन-ई ऑइल आणि तुमच्या आवडीचं एखादं एसेंशिअल ऑइल एकत्र करा. लेव्हेंडर ऑइल त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतं. तसेच टी-ट्री ऑइल पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. ही पेस्ट एका जारमध्ये ठेवू शकता.
कोरफड जेल, ऑर्गन ऑइल आणि एसेंशिअल ऑइल :
एलोवेरा जेलमध्ये एक चमचा ऑर्गन ऑइल आणि एसेंशिअल ऑइलचे काही थेंब एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि दररोज चेहऱ्यावर लावून मॉयश्चराइझ करा. यामुळे त्वचा मुलायम होण्यासोबतच त्वचेचं आरोग्यही चांगलं राखण्यासाठी मदत होते.
ग्रीन-टी आणि खोबऱ्याचं तेल :
ग्रीन-टीची पावडर एक कप नारळाच्या तेलामध्ये एकत्र करून थोड्या वेळासाठी ठेवून द्या. त्यांनंतर मिश्रण गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. एका काचेच्या जारमध्ये भरून ठेवून चेहऱ्यावर दररोज लावा. हे मॉयश्चरायझर त्वचेसाठी लाभदायक आहे. तसेच त्वचेच्या समस्या दूर होण्यासाठीही मदत होते.