वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका आपल्या त्वचेला बसत असतो. खाज येणे, पुरळ येणे, यांसारख्या त्वचेशी निगडीत समस्या उद्भवत असतात. या खाजेचे रुपांतर गंभीर स्वरुपाच्या स्कीन इन्फेक्शनमध्ये होतं. त्वचेवर लाल चट्टे येणे, डाग पडणे, एग्जीमा, सोसायसीस यांसारखे त्वचा रोग खाजेकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात. पण या आजारांपासून बचाव कारायचा असल्यास काय करायला हवं ते जाणून घ्या. बदलत्या वातावरणात त्वचेवर येत असलेल्या खाजेवर नियंत्रण मिळवायचं असेल तर काही टीप्स तुम्हाला सांगणार आहोत.
आजकाल महिला या त्वचा सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. या महागड्या क्रिम्समध्ये असणारं केमिकल्स हे त्वचेसाठी नुकसानकारक असतं. ब्लीच, फेशियल करताना सुध्दा त्यात वापरल्या जात असलेल्या केमिकल्सचा परीणाम त्वचेवर होऊन खाज यायला सुरूवात होते. तसंच वाढत्या प्रदुषणामुळे सुध्दा त्वचेवर नकारात्मक परीणाम घडून येत असतो. चला तर मग जाणून घेऊया त्वचेवर खाज न येण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय.
अॅलोवेरा
त्वचेसाठी अॅलोवेरा खूप फायदेशीर असतं तसंच याच्या वापराने त्वचेच्या सगळ्या समस्या दुर होऊ शकतात. काही महिलांची त्वचा खूप सेन्सिटीव्ह असते. ब्लीच केल्यानंतर त्वचेवर जळजळ होत असल्यास अॅलोवेरा जेल चेहऱ्याला लावल्यास आराम मिळेल. त्यासाठी अॅलोवेरा जेल हातांवर घेऊन त्वचेवर सर्क्युलर मोशनमध्ये लावा आणि मसाज करा. ५ मिनिटं मसाज केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
नारळाचं तेल
चेहऱ्याला नारळाचं तेल लावल्यास खाजेपासून आराम मिळतो. जर तुम्ही ब्लीच केलं असेल तर चेहऱ्याला येणाऱ्या खाजेपासून वाचण्यासाठी नारळाचं तेल फायेदशीर ठरेल.
दूध
दुधाचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. पण खाजेच्या समस्येला उपाय म्हणून दूध उपयोगी ठरतं. दूधात कॅल्शियम, व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणावर असतात. चेहऱ्यावर लाल डाग असल्यास चेहऱ्याला कच्च दूध लावल्याने फरक दिसून येईल.
तुळस
तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा.
बेकिंग सोडा
चेहर्यावर येणार्या खाजेपासून आराम मिळावा यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा आणि खाज येणार्या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा जखम असल्यास हा उपाय करू नका. पाण्याच्या बादलीत थोडासा बेकिंग सोडा घालून अंघोळ केल्यास खाजेपासून आराम मिळेल.