हिवाळ्यात आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी बॉडी लोशन असेल किंवा कोणतीही क्रीम असेल अशी वेगवेगळी उत्पादनं वापरत असतो. पण केसांकडे दुर्लक्ष होत असतो. बदलत्या वातावरणात पोषक घटकांची कमतरता भासत असल्यामळे केस मोठ्या प्रमाणात गळत असतात. गळण्यासोबतच फाटे फुटणे आणि कोंडा तयार होण्याची समस्या उद्भवते.
यावर उपाय म्हणून आपण महागड्या उत्पादनांना प्राधान्य देतो. पण त्याचा सुध्दा काही उपयोग होत नाही. केसांमध्ये अधिक केमिकल्सचा वापर केल्यास देखील केसगळती जास्त प्रमाणात होते. तुम्ही सुद्धा या कारणाने जर हैराण झाला असाल तर तुम्ही काही घरगूती टीप्सचा वापर करून चांगले केस मिळवू शकता.
केसांसाठी नारळाच्या तेलाचा वापर योग्य प्रकारे करायला हवा. नारळाच्या तेलात ३ ग्राम कापूर दळून घाला. हे तेल रोज रात्री केसांना लावून केसांच्या मुळांची मसाज करा. दररोज या तेलाने मसाज केल्यास फरक दिसून येईल. तसंच केल मऊ आणि मुलायम होतात.
केस गळणं थांबवण्यासाठी ५ टेबसस्पून मेंहेदीची पाऊडर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस तसंच १ अंड्याचा पांढरा भाग आणि १ टेबलस्पून मेथी, ४ टेबलस्पून आणि दही घालून रात्रभर भिजवा आणि केसांना लावा. त्यानंतर २-३ तासांनी केस धुवून टाका असे केल्यास फरक दिसून येईल. केस चमकदार दिसतील.
कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा. त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा. एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
केसांना पोषण मिळण्यासाठी अर्धा कप दही घ्या आणि त्यात २ टेबलस्पून मेधी घाला. तसंच ३ आवळे त्यात मिसळा. सकाळी याची पेस्ट तयार करून केसांना लावा. हे मिश्रण लावल्यानंतर केसांना २ ते ३ तास राहू दया असे केल्यास केस कोरडे पडणार नाहीत. तसंच लिंबाचा रस आणि नारळाचं तेल मिसळून केसांना लावा आणि २ तासांनी केस धुवून टाका. यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. तसंच केस घनदाट दिसतील. घरगुती साहीत्याचा वापर करून जर तुम्ही केसांची काळजी घेतली तर तुम्हाला केमिकल्सचा वापर न करता चांगले केस मिळवता येतील.