काजळ लावणं ही देखील एक कला आहे. काजल नीट लावलं तर डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. काही महिला आणि तरूणी काजळ कितीही नीट लावलं तरीदेखील ते पसरतं अशा समस्या करताना दिसतात. यासाठी तुम्ही करिनाकडून काजळ लावण्याच्या टिप्स घेऊ शकता. अनेकदा करिना वेगवेगळ्या रंगाचे काजळ आणि आयलायनर वापरताना दिसते. तुम्हीही करिनाच्या या टिप्स फॉलो केल्या तर त्यामुळे तुम्हाला करिनाप्रमाणे हॉट आणि बोल्ड लूक मिळवण्यास मदत होईल.
काजळ पसरण्याची कारणं
काजळ पसरण्याची मुख्य कारणं म्हणजे डोळ्यांजवळ येणारा घाम आणि डोळ्यांजवळची त्वचा ऑईली होणं ही आहेत. ज्याप्रकारे मेकअप करण्याआधी तुम्ही स्कीन स्वच्छ करता. त्याचप्रमाणे काजळ लावण्याआधी डोळे टिशू पेपरने नीट स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी एक बर्फाचा तुकडा कपड्यात बांधून आयलिड्सवर काही सेकंदं का होईना ठेवा. त्यानंतर काजळ लावा. त्यामुळे काजळ पसरणार नाही आणि दिवसभर तुमचे डोळे बोल्ड दिसण्यास मदत होईल.
काजळ लावताना डोळ्यांच्या कडांवर थोडी जागा सोडा
डोळ्यांच्या बाहेरील कडेपासून सुरू करत काजल आतल्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करा. याव्यतिरिक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, डोळ्यांच्या आतील कडेला काजळ लावताना शेवटच्या कोपऱ्यापर्यंत न लावता थोडी मोकळी जागा सोडा. त्याचसोबत इनर कॉर्नरपर्यंत एका बारिक रेषेमध्ये काजळ लावा.
काळ्या रंगाच्या काजळामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल
काळ्या रंगाचं काजळ लावल्यामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल. त्याऐवजी जर तुम्ही न्यूड काजळ लावलं तर डोळे छोटे दिसतील.
छोट्या डोळ्यांना आयलायनर लावा
न्यूड काजळाचा शेड छोट्या डोळ्यांसाठी योग्य ठरतो. काजळ आणि लायनर डोळ्यांच्या आकारानुसार लावा. मोठ्या डोळ्यांना ज्याप्रमाणे काजळ शोबत त्याचप्रमाणे छोट्या डोळ्यांना आयलायनरमुळे हटके लूक मिळतो.