(Image Credit : inlifehealthcare.com)
सगळ्यांनाच आपली त्वचा कायम चमकदार रहावी असे वाटत असते. खासकरुन महिलांना हे अधिक वाटतं. पण प्रत्येकाचीच ही इच्छा पूर्ण होत नाही. असे न होण्याची अनेक कारणे आहेत. त्यात त्वचेची योग्यप्रकारे स्वच्छता न करणे आणि आवश्यक पोषक तत्व न मिळणे यांचा समावेश आहे. जर तुम्हीही बाजारातील वेगवेगळी उत्पादने वापरून थकले असाल तर काही घरगुती उपायांचा विचार तुम्ही करायला हवा. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याने तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर बनवण्यास मदत करतील.
त्वचेवर ब्लॅकहेड्स होणे ही कॉमन समस्या झाली आहे. ब्लॅकहेड्स जास्तीत जास्त नाकावर आणि नाकाच्या आजूबाजूला होतात कारण ही जागा सर्वात जास्त तेलकट असते. नाकाजवळ जे ब्लॅकहेड्स असतात ते दूर करणे एकप्रकारे आव्हानच आहे. कारण ते सतत येतात. पण या घरगुती उपायांनी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि डेड स्कीनपासून सुटका मिळवता येऊ शकतो.
ओट्स आणि चंदन
तसे तर ओट्स खाण्याच्या कामात येतात पण हे चंदनात मिश्रीत केल्यास त्वचेसाठी एक चांगला फेसपॅक तयार होतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे ओट्स आणि एक चमचा चंदन पावडर घ्यावं लागेल. हे चांगल्याप्रकारे मिश्रीत करुन त्यात गुलाबजल टाका. पेस्ट तयार व्हावी इतकंच गुलाबजल टाका. ही पेस्ट १५ मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.
पपई आणि चंदन
पपईमध्ये चेहरा चमकदार करण्याची अधिक क्षमता असते. पपई आणि चंदन एकत्र करुन लावल्यास त्वचेवरील ब्लॅकहेड्स सहज दूर होतील. पपईच्या बीया वेगळ्या करुन गर चांगला बारीक करुन घ्या आणि त्यात अर्धा चमचा चंदन टाका आणि अर्धा चमचा कोरफडीचं तेल टाका. त्यानंतर त्यात काही थेंब गुलाबजल टाका. ही पेस्ट १० मिनिटांसाठी तशीच ठेवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
टोमॅटोचा असा करा वापर
जर तुम्ही रोज टोमॅटोचा समावेश डाएटमध्ये कराल तर याचा तुम्हाला फायदा होता. यासाठी एक छोटा टोमॅटो बारीक करा. त्यात एक चमचा साखर टाका दोन मिनिटे हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकक्ष करा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा. तुम्हाला फरक दिसेल.