डार्क अंडरआर्म्सची समस्या सगळयाच महिलांना सर्वाधिक जाणवत असते. घामामुळे आणि स्लिवलेस ड्रेस घातल्यामुळे हात जास्त काळे होत असतात. अनेकदा वॅक्स न करता केस काढण्यासाठी रेजरचा वापर केला जातो. त्यामुळे काखेत काळपटपणा येत असतो क्रीम, पावडर वारंवार लावून सुद्धा हात चांगले दिसत नाहीत.
तुम्हाला अशाच त्रासाला सामोरं जावं लागतं असेल तर आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे. सगळेच उपाय करण्यासाठी आपल्याला पूरेसा वेळ नसतो. त्यातले काही उपाय जरी केले तरी तुम्ही हवी तशी त्वचा मिळवू शकता.
लिंबू
नेहमी अंघोळीच्या दहा मिनिट आधी लिंबू घेऊन ५ मिनिटं आपल्या अंडरार्म्सना चोळा. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करा. अंघोळीनंतर त्या भागाला बॉडी लोशन लावा.लिंबात सायट्रिक एसिड असतं. जे तुमच्या त्वचेवरील मेलानिन कमी करून फरक जाणवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे आपली त्वचा फेअर होत जाते. पण त्यासाठी सतत दोन आठवडे तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे.
कच्चा बटाटा
कच्चा बटाटा सौंदर्याच्या दृष्टीने महत्वाचा समजला जातो. त्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही फक्त एक बटाटा कापावा लागेल. त्या बटाट्याने फक्त तुम्हाला अंडरआर्म्सना चोळायचं आहे. बटाट्याचा रस थंड करून त्वचेवर लावल्याने काळपटपणा दूर होतो. रोज हा प्रयोग केल्याल फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-मेकअप रिमुव्हरसाठी खर्च कशाला? घरीच तयार करून मिळवा चमकदार चेहरा)
एलोवेरा
एलोवेराचे त्वचेला होत असलेले फायदे आपल्याला माहीत आहेत. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये एलोवेराचा वापर केला जातो. त्यासाठी एलोवेरा जेल अंडरआर्म्सना लावून मसाज करा. कोरफडमध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे हे त्वचेला योग्य तऱ्हेने हायड्रेट करतं तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. कोरफड त्वचेची इलास्टिसिटी सुधारते आणि त्यामुळे फाईन लाईन्स, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. ( हे पण वाचा- डार्क सर्कल्स त्वचेचा लूक बिघडवत असतील, तर बादामाचं तेल वापरून चेहरा होईल आकर्षक!)