शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मेकअप काढण्यासाठी 'या' घरगुती पदार्थांचा असा करा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 5:57 PM

मेकअप  करताना काळजी कशी घ्यायची किंवा मेकअप कसा कारयचा हे तुम्हाला माहीत असतं

मेकअप  करताना काळजी कशी घ्यायची किंवा मेकअप कसा कारायचा हे तुम्हाला माहित असतं पण चेहऱ्याला अप्लाय केलेला मेकअप काढणं सुध्दा तितकचं महत्वाच असतं. कारण मेकअप तसाच ठेवून जर तुम्ही झोपलात तर चेहऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.  कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा चेहऱ्याची छिद्र ओपन होत असतात. आणि  मेकअप तसाच ठेवून झोपलात तर पिंपल्स येण्याची शक्यता असते. 

(image credit- lorialparis)

जर हेल्दी स्कीन ठेवायची असेल तर  वेळोवेळी काळजी घेणं आवश्यक असतं.  बाजारात मेकअप काढण्यासाठी वेगवेगळ्या कंपनींची उत्पादनं असतात. पण महागड्या आणि केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती साहित्याचा वापर करून जर तुम्ही मेकअप काढलात जर त्वचेचं नुकसान होणार नाही. तसंच त्वचा आणखी उजळदार दिसेल. 

(image credit- lifestyleblog)

मेकअप काढण्यासाठी लिंबाचा रस आणि १०० ग्रॅम दही मिक्स करा. त्यात बदामचं तेल घाला. या मिश्रणाला ब्लेंड करून घ्या. त्यानंतर या मिश्रणाला चेहऱ्याला लावून मेकअप काढा. तसंच ३ ते ४ बदाम बारीक वाटून घ्या. त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. नंतर पेस्टचा वापर चेहऱ्यावर करा.

४ चमचे अ‍ॅलोवेरा जेलमध्ये १-२ चमचे आल्मंड ऑईल, ग्लिसरीन आणि अर्धा चमचा विटामीन ई चे ऑईल घाला. ते चेहऱ्याला अप्लाय करा. त्यानंतर टिश्यु पेपरचा वापर करुन  चेहरा पुसून घ्या.

(image credit- Yummy Mummy club)

१ चमचा मिल्क पावडर घेऊन त्यात २ बदाम कु़टून घाला. नंतर साखर घाला. यात गुलाबजल घालून पेस्ट करून घ्या.  हे मिश्रण चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 

३ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडंस मध घाला. हे मिश्रण मिक्स करुन झाल्यानंतर २० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

१ चमचा हळद घेऊन त्यात लिंबाचा रस घाला.  हे मिश्रण १५ मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

अ‍ॅपल साईडर व्हिनेगर त्वचेसाठी फायदेशीर ठरतं असतं. त्यासाठी अ‍ॅपल साईडर व्हिनेगर चेहऱ्याला लावून ठेवा. ते त्वचेवर टोनर आणि क्लींजरचं काम करेल. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स