अनेक मुली आपल्या मानेच्या काळपटपणामुळे निराश असतात. वेगवेगळ्या क्रिम्स लावून चेहरा तर सुंदर दिसतो. पण मानेचा रंग काळा दिसत असतो. तेव्हा आपला लूक खूप खराब दिसत असतो. कोणतेही कपडे घालताना खूप विचार करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मानेचं टॅनिंग दूर करण्याचे काही घरगुती उपाय सागंणार आहोत.
लोक नेहमी अंघोळ करताना आपल्या मानेला घासत असतात. पण तुम्हाला माहीत आहे की सतत चोळत राहील्यामुळे किंवा घासत राहिल्यामुळे मानेची त्वचा उजळत तर नाहीच पण लाल होते. या उपायांचा वापर करून तुम्ही घरच्याघरच्याघरी दूर करू शकता.
काळ्या मानेची समस्या दूर करण्यासाठी साखर हा उत्तम पर्याय आहे. यासाठी साखरेचं स्क्रब सुद्धा असतं. याचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी मान पाण्याने धुवा. मग हे साखरेचं स्क्रब मानेला लावा. १५ मिनिटांपर्यंत हे स्क्रब लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने मान धुवून टाका.
हा प्रयोग एक आठवडा केल्यानंतर मानेचा काळपटपणा दूर होऊन चमकदार दिसेल. या व्यतिरिक्त साखरेचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. थो़डीशी साखर घेऊन उकळत्या पाण्यात घाला.नंतर पाण्याला थंड होऊ द्या. नंतर या साखरेच्या पाण्याने मानेची मसाज करा.
बटाट्याचा वापर करून सुद्धा तुम्ही मानेचा काळपटपणा दूर करू शकता. त्यासाठी कच्चा बटाटा मधोमध कापा आणि मानेवर चोळा किंवा बटाट्याचा रस लावला तरी चालेल. त्यामुळे कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तुमची त्वचा चांगली दिसेल. तसंच मानेचा काळपटपणा दूर होईल. ( हे पण वाचा- कोपर काळे झाले म्हणून हात झाकावा लागतोय? 'हे' उपाय करून काळपटपणा कायमचा होईल दूर)
मानेवर फरक दिसून आल्यानंतर तुम्हाला कोणताही ड्रेस किंवा आऊटफिट घालताना काळ्या झालेल्या मानेबद्दल विचार करावा लागणार नाही. कारण जर शरीरावरील एखादा भाग जरी व्यवस्थित नसेल काळपटपण आला असेल तर चारचौघात चांगलं दिसत नाही. ( हे पण वाचा-पार्लरच्या थेरेपीवर खर्च करणं सोडा, आठवड्यातून फक्त एकदा मुगाची डाळ वापरून मिळवा ग्लोईंग त्वचा )