शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

पाठीचा आणि कमरेचा काळपटपणा दूर करण्यासाठी वापरा 'हे' उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 2:28 PM

हिवाळ्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे त्वचेशी निगडीत वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात.

(image credit- tanbox.co.nz)

हिवाळ्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे त्वचेशी निगडीत वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. त्वचा कोरडी पडणं, काळपटपणा येणं अशा समस्यांचा सामना करावा  लागतो.  पण चेहरा उजळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करत असतो. तुलनेने शरीराच्या इतर भागांवरील त्वचेकडे दुर्लक्ष होत असतो. चेहरा सुंदर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स वापरतो. त्याचा परिणाम होऊन आपली मान आणि पाठ यांच्यापेक्षा चेहरा गोरा दिसतो.  दिवसेंदिवस मानेचा तसंच पाठीचा काळा भाग तसाच राहतो.

यावर उपाय करण्याचा विचार केल्यास संपूर्ण शरीराला फेअरनेस क्रीम लावणं शक्य नसतं.  तसंच सध्याच्या काळातील नवीन फॅशनचे कपडे घालण्याचा खूप विचार करायला लागतो. म्हणजेच बॅकलेस टॉप आणि  मोठ्या गळ्यांच्या डिजाईन्सचे ब्लाऊज घालायचे असतील तर  शरीराचा उघडा असणारा भाग गोरा दिसायल हवा असं सगळ्याच स्त्रियांना वाटत असतं. असे कपडे  घातल्यानंतर चेहरा आणि पाठीची त्वचा यात फरक दिसून येत असतो. त्वचेच्या रंगातील हा बदल टाळण्यासाठी काही टिप्सचा वापर करून तुम्ही  कमरेची आणि मानेची त्वचा सुद्दा चेहऱ्या प्रमाणेच उजळवू शकता. 

आपली चादर स्वच्छ ठेवा

तुम्ही झोपण्यासाठी ज्या चादरींचा  आणि उशांचा वापर करत असता त्या स्वच्छ ठेवा. कारण जर ते अस्वच्छ असेल तर बॅक्टीरीयांचे इन्फेक्शन त्वचेवर होण्याची शक्यता असते.  त्यामुळे खाज आल्याने  त्वचा काळी पडते. तसंच  पुळ्यांचे डाग पडू शकतात.

जास्त गरम पाण्याचा वापर करू नका

अंघोळ करण्यासाठी हलक्या कोमट पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाणी अंघोळ करण्यासाठी वापरू नका. कारण त्यामुळे स्कीन बर्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाज येते. तसंच त्वचा काळी पडते.

लोफहचा वापर 

जर तुम्हच्या पाठीवर सारखे पिंपल्स येत असतील तर तुम्ही ज्या वस्तूने अंग घासता तो लोफहा बदला.  ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या दूर होईल. पाठीवर येत असलेल्या पुळ्या किंवा डाग रोखण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरेल.

स्क्रबचा वापर

 

त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबचा वापर करा. त्यामुळे त्वचेवर मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा उजळेल. त्यासाठी तुम्ही घरगुती घटकांचा  स्क्रब म्हणून वापर करू शकता. बेसनाचे पीठ, हळद, दूध यांचा वापर करून स्क्रब तयार केल्यास त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.

त्वचा डिहाड्रेट होऊ न देणे

त्वचा सुंदर करण्यासाठी सगळ्यात महत्वाच असतं ते म्हणचे त्वचेला पोषण मिळणं. हे पोषण आहारातून मिळत असतं. त्यामुळे आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.  दररोज ७ ते ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स