मिठाशिवाय जेवणाची चव व्यर्थच असते. प्रत्येक घरामध्ये मीठ अगदी सहज आढळून येतं. साधारणतः मिठाचा वापर जेवणामध्ये करण्यात येतो. परंतु तुम्ही कधी मिठाचा वापर त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी केलाय का? त्वचेसाठी मिठाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. मीठ हे एक नैसर्गिक मिनरल आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मीठ ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. जर तुम्ही साध्या मिठाऐवजी समुद्री मिठाचा वापर करत असाल तर हे अत्यंत उपयोगी ठरतं. मीठ त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मिठाच्या पाण्यामध्ये मिनरल्स म्हणजेच कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडियम इत्यादी तत्व आढळून येतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात. जाणून घ्या सौंदर्य वाढविण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या वापराबाबत काही टिप्स...
मिठाच्या पाण्याचे फायदे :
पिपल्सपासून सुटका
पिंपल्सच्या प्रॉब्लेम्सने त्रस्त असाल तर मिठाच्या पाण्याचा वापर करा. मिठाच्या पाण्यामध्ये असलेल्या हिलिंग प्रॉपर्टिज त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही पिंपल्समुळे कंटाळल्या असाल तर, त्यासाठी एक कप पाण्यामध्ये एक चमचा समुद्री मीठ एकत्र करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर चेहरा पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा.
त्वचेला एक्सफोलिट करा
त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. मीठाच्या रफ टेक्स्चरमुळे त्वचेला व्यवस्थित एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतं. मीठ आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. मीठाचे प्रमाण जास्त ठेवून हळूहळू त्वचेवर मसाज करा.
त्वचेवर कापल्यानंतर
मिठामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेवर कापलं तर ठिक करण्यासाठी मदत करतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने बॅक्टेरियाला मारल्याने मदत मिळते. त्याचबरोबर त्वचेवरील जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
त्वचा उजळवण्यासाठी
त्वचेचा मूळ रंग जाऊन काळवंडली असेल तर त्वचेला बाहेरील पोषणासोबतच आतूनही पोषण देण्याची गरज असते. त्यासाठी दररोज हलक्या गरम पाण्यामध्ये एक चमचा साधं मीठ एकत्र करा. यामुळे शरीर डिटॉक्सीफाय होण्यास मदत होते. सूज कमी होते त्याचबरोबर त्वचा उजळण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.