हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याच्या आणि केस गळण्याची समस्या जास्त जाणवते. अनेक महिला आणि पुरूषांचे अकाली केस गळण्यामुळे टक्कल पडलेलं असतं. हिवाळ्यात ही समस्या जास्त जाणवते. केस अकाली गळल्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. अनेकजण डोक्याला पडलेलं टक्कल कसं काळ्याभोर केसांनी झाकता येईल याचा विचार करत असतात.
महागड्या क्रिम्स आणि ट्रिटमेन्टस घेऊन सुद्दा केसांवर काही फरक पडत नसतो. जर तुम्हाला सुद्धा याच समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काही घरगुची उपायांचा वापर करून सुंदर केस मिळवू शकता. मग जाणून घेऊया घरगूती वापरात असलेल्या कोणत्या पदार्थामुळे तुमची केस गळण्याची समस्या दूर होईल.
थंडीच्या वातावरणात शरीराला उष्णता मिळण्यासाठी मेथीचे सेवन केले जाते. अनेक घरात मेथीचे लाडू तयार केले जातात. कारण मेथीच्या लाडूच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळत असतात. तसंच शरीरात उष्ण्ता तयार झाल्यामुळे हिवाळ्यात थंडीचा जास्त त्रास होत नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का मेथीचा वापर केसांसाठी सुद्धा केला जातो. केसांवर मेथीचा वापर केल्यास केस गळण्याची समस्या दूर होते. मेथीचे सैंदर्य प्रसाधनांमध्ये फार महत्व आहे. ( हे पण वाचा-पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे उपाय...)
मेथीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात. तसंच टक्कल पडलेल्या भागावर केस यावेत म्हणून मेथीचे सेवन फायदेशीर ठरत असतं. यात असलेले पोटॅशियम केसांना पांढरे होण्यापासून वाचवत असते. यासाठी तुम्ही मेथीच्या पानांना नारळाच्या दुधात मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. हा प्रयोग केल्यास केस गळण्याची समस्या दूर होईल. केसांवर जर तुम्ही मेथीचा वापर केलात तर कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय तुम्ही सुंदर केस मिळवू शकता.
यासाठी मेथीची पावडर करून घ्या. या पावडरमध्ये नारळाचं तेल आणि ऑलिव्ह ऑईल घाला. या मिश्रणाची पेस्ट तयार करून केसांना लावल्यास फरक दिसून येईल. केसांमध्ये फोड येण्याची समस्या तुम्हाला उद्भवत असेल तर मेथीच्या पावडरमध्ये दही घालून केसांना लावा.( हे पण वाचा-थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका!)
केसांच्या वाढीसाठी मेथीचा वापर लाभदायक ठरतो. त्यासाठी मेथीचे काही दाणे पाण्यात २४ तास भिजवत राहू द्या. नंतर २४ तासांनी ते पाणी का़ढून मेथी वेगळी काढा. मग ते पाणी केसांना लावा. केस अशा अवस्थेत तीन तास राहू द्या. यानंतर केस कोमट पाण्याने धुवून टाका.