How to prevent wrinkles on face: कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या की, तुमचं सौंदर्य प्रभावित होतं. इतकंच नाही तर कमी वयातच म्हातारे दिसू लागल्याने तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येण्याची कारणे वेगवेगळी असतात. यातील एक महत्वाचं कारण म्हणजे त्वचेची योग्य काळजी न घेणं आणि त्वचेला पोषण न मिळणं. जर त्वचेची योग्य काळजी घेतली, पौष्टिक आहार घेतला आणि त्वचेवर योग्य गोष्टी लावल्या तर ही समस्या दूर करता येऊ शकते. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे या उपायासाठी तुम्हाला जास्त पैसेही खर्च करण्याची गरज पडणार नाही.
त्वचेसाठी फायदेशीर गोष्टींबाबत सांगायचं तर हळद आणि तुरटी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. या दोन्ही गोष्टींचा जर तुम्ही त्वचेवर एकत्र वापर केला तर त्वचेवर बराच बदल दिसेल आणि त्वचा जास्त काळ तरूण ठेवण्यासही मदत मिळेल. अशात हे जाणून घेऊया की, त्वचेवर तुरटी आणि हळदीचं मिश्रण लावल्याने त्वचेसंबंधी कोणत्या समस्या दूर होतात.
सुरकुत्या दूर करतं हळद आणि तुरटीचं मिश्रण
चेहऱ्यावर हळद आणि तुरटी लावल्याने तुमच्या चेहऱ्या सुरकुत्या दिसणार नाही. हळद आणि तुरटीमध्ये आढळणारे तत्व त्वचेवर अॅंटी-एजिंग प्रभाव टाकतात. यामुळे तत्वा टाईट राहते आणि सुरकुत्याही दूर होतात.
चेहऱ्यावर येते नवीन चमक
अनेकदा बघण्यात आलं आहे की, वय वाढण्यासोबतच त्वचेची चमक कमी होऊ लागते आणि त्वच ड्राय होऊ लागते. त्वचेचा रखरखतीपणा वाढल्याने त्वचेवर डाग आणि सुरकुत्या दिसतात. सोबतच त्वचा सैल आणि कमजोर दिसू लागते. सैल आणि कमजोर त्वचेमध्ये पुन्हा चमक आणण्यासाठी तुम्ही हळद आणि तुरटी मिक्स करून लावू शकता.
तसेच हळदीमध्ये तुरटी मिक्स करून लावल्याने त्वचेवर होणारं इन्फेक्शन आणि पिंपल्सची समस्याही कमी करण्यास मदत मिळते. याने त्वचा निरोगी आणि फ्रेश दिसतो.
हळद आणि तुरटीचा कसा कराल वापर?
एक ते दोन चिमूट हळद पावडर घ्या आणि तेवढ्याच प्रमाणात त्यात तुरटी पावडर टाका. नंतर यात गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.