Alum for dark neck : अनेक लोकांबाबत हे बघितलं जातं की, त्यांच्या पूर्ण शरीराची त्वचा ही गोरी असते, पण मानेच्या आजूबाजूचा भाग डार्क किंवा काळा असतो. मानेची त्वचा काळी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. उन्हात जास्त राहणे, केसांमधून येणारा घाम, तेल, धूळ, जेनेटिक, लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टेंस, एलर्जी इत्यादी काही कारणे सांगता येतील. मानेचा हा काळपटपणा लपवण्यासाठी लोक नको नको ते करतात आणि वेगवेगळे क्रीम व उपाय करतात. पण त्यांना फायदा मिळतोच असं नाही.
मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी कामात येऊ शकते. तुरटीमध्ये मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते. लोक त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करत असतात. फक्त तुम्हाला याच्या वापराची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे.
तुरटीचे फायदे
तुरटीमध्ये अॅंटी-बायोटिक, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचा चांगली ठेवण्यासाठी, त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुरटीमुळे त्वचा उजळते आणि त्वचेची आतून सफाई होते.
तुरटीने मानेचा काळपटपणा दूर कसा कराल?
मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा तुरटीचं पावडर घ्यायचं आहे आणि त्यात समान प्रमाणात मुलतानी माती टाकायची आहे. त्यानंतर यात गुलाब जल आणि १ ते २ चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे. याची चांगली पेस्ट तयार करा. पेस्ट मानेवर आणि शरीरावर जिथे काळे डाग आहेत तिथे लावा. १५ ते २० मिनिटे ही पेस्ट तशी राहू द्या.
जेव्हा ही पेस्ट चांगली कोरडी होईल तेव्हा साध्या पाण्याने त्वचा धुवून घ्या. फक्त मान धुताना साबणाचा वापर करू नका. आठवड्यातून ३ ते ४ वेळा किंवा रात्री झोपण्याआधी हा उपाय करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
दुसरा उपाय
त्याशिवाय मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुरटी, बेकिंग सोडा आणि गुलाब जल यांचं एक मिश्रण तयार करा. हे मानेवर लावा आणि काही वेळाने धुवून टाका. यानेही तुम्हाला फायदा मिळू शकतो.
तुरटीचे त्वचेला होणारे फायदे
- टूथपेस्ट आणि माउथफ्रेशसारख्या गोष्टींमध्ये तुरटीचा वापर केल्याने हिरड्यांवरील सूज कमी होते आणि तोंडातील बॅक्टेरियाही नष्ट होतात.
- तुरटी त्वचेसाठी रामबाण उपाय मानली जाते. याने पिंपल्स आणि त्वचेवरील फोड दूर करण्यास मदत मिळते. तुरटीमुळे त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात.
- रोज आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी फिरवली तर तुम्हाला फायदा मिळेल. कारण याने तुमच्या शरीराची दुर्गंधी लगेच दूर होईल.