Alum for Hair : आजकाल जास्तीत जास्त लोकांना महिला असो वा पुरूष सगळ्यांना केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाला मजबूत, काळे, मुलायम आणि चमकदार केस हवे असतात. अशात लोक वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण यांचे अनेक साइड इफेक्ट्सही असतात. ज्यामुळे केसांचं नुकसान होतं. मात्र, तुम्ही ५ रूपयांच्या तुरटीने केसांचं चेहरा मोहराच बदलू शकता.
त्वचेसाठी तुरटीचा वापर आणि त्याच्या फायद्यांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. मात्र, आज आम्ही तुम्हाला तुरटीचा केसांसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत. एक्सपर्टने सांगितलं की, केसगळतीची समस्या, डॅंड्रफ, कमजोर केसांची समस्या दूर करण्यात याने मदत मिळेल. चला जाणून घेऊ तुरटीने केस धुण्याची योग्य पद्धत...
चेहऱ्यासोबतच तुरटी केसांसाठीही फायदेशीर असतं. या उपायाने डोक्याची त्वचा, केस साफ होतील आणि चमकदारही होतील.
तुरटीचा हेअर वॉश बनवण्यासाठी साहित्य
साखर १ चमचा
तुरटी एक तुकडा
खोबऱ्याचं तेल २ चमचे
तांदळाचं पाणी एक वाटी (केस जास्त लांब असतील तर हे पाणी दोन वाटी घ्याल)
१ पाउच शाम्पू
कसं तयार कराल हे पाणी?
सगळ्यात आधी साखर आणि तुरटी बारीक करून पावडर बनवा. नंतर पावडर एका बाउलमध्ये टाका आणि त्यात खोबऱ्याचं तेल, तांदळाचं पाणी आणि शाम्पू टाकून मिक्स करा. तुमचं तुरटीचं हेअर वॉश पाणी तयार आहे. आता हे पाणी केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवर शाम्पूसारखं लावा. हलक्या हाताने केसांची मालिश करा आणि नंतर केस साध्या पाण्याने धुवून घ्या. केस चमकदार, मुलायम होतील. हा उपाय रोज करू नका. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता.
केसांवर तुरटी लावण्याचे फायदे
हिवाळ्यात डॅंड्रफची समस्या खूप जास्त वाढते. अशात तुरटीचा अशाप्रकारे वापर करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता. तसेच याने डोक्याची त्वचा साफ होते आणि केसांची वाढही होते.