Coconut Oil For Wrinkles : सगळ्यांनाच असं वाटत असतं की, त्यांची त्वचा चमकदार आणि ताजीतवाणी दिसावी. पण वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयातच चेहऱ्या सुरकुत्या येऊ लागतात. वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येणं सामान्य बाब आहे. पण कमी वयात सुरकुत्या आल्या की अडचण होते.
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की, व्यक्ती म्हातारी दिसू लागते. अशात या सुरकुत्या घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांनाच याचा फायदा मिळतो असं नाही. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला खोबऱ्याच्या तेलाची मदत मिळेल.
खोबऱ्याच्या तेलातील गुण
खोबऱ्याच्या तेलामधील व्हिटॅमिन ई आणि फॅटी-अॅसिड चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतं. खोबऱ्याच्या तेलामध्ये काही अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे त्वचा खराब होण्यापासून बचाव करतात. सुरकुत्या दूर करण्यात खोबऱ्याच्या तेलाची महत्वाची भूमिका असते.
कसा कराल वापर?
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी एक चमचा खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात व्हिटॅमिन ई चे २ ते ३ थेंब टाका. नंतर हे मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा. थोडा वेळ मालिश केल्यानंतर तेल रात्रभर चेहऱ्यावर तसंच राहू द्या. सकाळी चेहरा पाण्याने धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल.
मध आणि खोबऱ्याचं तेल
दुसरा उपाय म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि मध. मधामुळे त्वचा मुलायम होते आणि क्लीन होते. तसेच मधाने सुरकुत्या दूर होण्यास आणि फाइन लाईन्स दूर करण्यासही मदत मिळते. यासाठी एक चमचा खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात १ ते २ थेंब मध टाका. हे चांगलं मिक्स करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर तसंच ठेवा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. नियमितपणे हा उपाय केल्याने तुम्हाला लवकर फरक दिसेल.